शिवसेना पक्षाच्या महाड विधानसभा समन्वयकपदी निलेश केसरकर.

प्रतिनिधी:-सचिन पवार
माणगाव रायगड
माणगाव : माणगाव तालुक्यातील पहेल गावचे सुपुत्र कट्टर शिवसैनिक ज्यांचा महाड विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असलेले युवा उद्योजक निलेश रामदास केसरकर यांची शिवसेना पक्षाच्या महाड विधानसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी नियुती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने नामदार मंत्री भरत गोगावले यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी निलेश केसरकर यांची महाड विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक पदावर नियुती केली आहे. निलेश रामदास केसरकर यांना, चिंचवळी येथे शिव मंदिर उद्घाटनप्रसंगी पक्षाचे महाड विधानसभा मतदार संघचे मंत्री नामदार भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते नियुतीचे पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चालके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, माजी जिल्हा प्रमुख विजयराज खुळे, उध्दोजक श्रीनिवास बेंडखळे, उध्दोजक प्रकाश हारवंंडकर, उपतालुकाप्रमुख जगदीश जोशी, माजी सभापती महेंद्र तेटगुरे,संपर्कप्रमुख प्रताप घोसाळकर, लोणेरे विभाग प्रमुख रवि टेंबे,युवासेना उपतालुकाप्रमुख अभिजित टेंबे, दिनेश हारवंंडकर, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम,माजी सरपंच वामन बैकर, गोरेगाव शहर प्रमुख सचिन शिगवण, उपशहरप्रमुख नथुराम बामनोलकर,सज्जाद गोडमे, रोहित रातवडकर,यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख उपशहरप्रमुख तसेच अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक चिंचवळी ग्रामस्थ तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.