मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे १०० दिवसाचा कृती आराखडा अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण यांची उत्कृष्ट कामगिरी

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १५ ठाणे



मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशांन्वये १०० दिवसाची कार्यालयीन सुधारणा मोहीम दिनांक ०७-०१-२०२५ ते दिनांक १६-०४-२०२५ या कालावधीत पोलीस आयुक्त ठाणे शहर घटकात राबविण्यात आली होती.सदर कार्यक्रमामध्ये प्रमाणपत्राचे वाटप पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांचे हस्ते दि १५ रोजी देण्यात आले.
पोलीस उपायुक्त कार्यालय स्तरावर अतुल उत्तमराव झेंडे परिमंडळ ३ कल्याण यांना पहिला क्रमांक, सहायक पोलीस आयुक्त स्तरावर सुहास हेमाडे,सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग यांना प्रथम क्रमांक २)कल्याणजी घेटे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग यांना तृतीय क्रमांक आणि
पोलीस स्टेशन स्तरावर परिमंडळ ३ कल्याण मधील विजय कादबाने मानपाडा पोलीस ठाणे यांना द्वितीय क्रमांक असे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.