पुण्यात वहातूक पोलीसांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन संपन्न. .

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कल्पनेतुन पुणे वाहतूक पोलीस अॅकेडमी संकल्पना साकारण्यात येत आहे. सह. पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर वाहतूक पोलीसांसाठी प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. दिनांक २३.०२.२०२५ ते १०.०५.२०२५ या कालावधीत एकुण १८ सत्रात प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षण सत्रामध्ये मानांकीत व आंतरराष्ट्रीय पातळीचे तज्ञ यांचेकडुन वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणमध्ये सॉफ्ट सिक्ल, मानसोपचार, मोटार वाहन कायाद्याचे प्रशिक्षण व त्यांचे नियमन, ग्रीन कॅरीडार व व्हिव्हिआयपी कॅन्व्हाय दरम्यान करायची कार्यवाही वाहतूक पोलीसांचे जनतेशी वागणे व सीपीआर (फस्ट एड ट्रीट्रमेंट) ट्राफीक ई-चलान प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच वाहतूक शाखेस नेमणूकीस असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त ज्ञान देण्यात आले आहे.

पुणे वाहतूक पोलीस अॅकेडमी प्रशिक्षण सत्रामध्ये वाहतूक शाखेस कार्यरत १००% पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात सदर अॅकडमी मध्ये तांत्रिक व इतर प्रशिक्षणाचा अंर्तभाव केला जाणार आहे. तसेच पोलीस व नागरीक यांच्यामधील संवाद वाढविण्यासाठी प्रशिक्षण व्याप्ती वाढविली जाणार आहे.

➤ दिनांक २३.०२.२०२५ ते दिनांक १०.०५.२०२५ या कालावधीत प्रत्येकी तीन दिवसाच्या एकुण १८ सत्रात सकाळी १०.०० ते साय. १७.०० वाजेपर्यंत वाहतूक शाखेतील एकुण ६३ पोलीस अधिकारी व

१०४५ पोलीस अंमलदार यांचे प्रशिक्षण देण्यात आले.

वाहतुक शाखा पुणे शहर कडील १००% हजर अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, यांनी वाहतुक नियमन, पोलीसांचे जनतेशी वर्तन व कर्तव्य बाबत प्रशिक्षण दिलेले आहे.

अश्विनी मल्होत्रा CEO Weikfield food pvt.ltd. व श्री अजय अगरवाल, डायरेक्टर, Top Management Consortium Foundation, श्रीमती मंजिरी गोखले, Elephant Connect तसेच श्री. श्रीकांत पाटील डायरेक्टर tmcfO वांचे मोलाचे सहकार्य या प्रशिक्षणास मिळाले आहे.

नमुद ख्यातनाम प्रशिक्षकयांनी प्रशिक्षण दिले आहे.

१. श्री मनोज पाटील

२. श्री सुरेश गोखले

४. श्रीमती उर्मिला दिक्षीत

५. श्रीमती मेधा कदम

६. श्री अनिल पंतोजी (RTO)

७. श्री प्रकाश जाधव (RTO)

:- वाहतुक नियमन, पोलीसांचे जनतेशी वर्तन व कर्तव्य

:- सॉफ्ट स्किल

:- सॉफ्ट स्किल (मानसोपचार तज्ञ)

:- सॉफ्ट स्किल

:- Rules of the road regulation

:- मोटार वाहन कायदा प्रकरण ८ वाहतूक नियंत्रण

:- मोटार वाहन कायदा

८. श्री अशोक शिंदे (RTO)

९. सेनि. सपोआ महादेव गावडे

:- मोटार वाहन कायदा

१०. सेनि.स.पो.आ. श्री विजय पळसुले

:- व्हि.व्हि.आय.पी कॅनव्हॉय, फायर ब्रिगेड

११. सेनि.स.पो.आ. श्री सुरेंद्र देशमुख

:- ग्रीन कॉरीडोर

१२. श्रे. पोउपनि श्री रघतवान

:- मॅन्युअल सिग्नल

१३. डॉ. श्याम गायकवाड, जहांगीर हॉस्पीटल –

PCR First Aid Treatment

१४. श्री अमित गोंजारी

:- ट्राफिक ई-चलान प्रॅक्टीकल

या प्रशिक्षण सत्रात भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी / अंमलदार यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

वा प्रशिक्षणामुळे वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी / अंमलदार यांना वाहन कायदे, तंत्रज्ञान, ई-चलन मशीनचा योग्य वापर, जनतेशी सौज्यन्याची वागणूक, अचानक येणाऱ्या अडचणी किंवा अपघात प्रसंगी घ्यावयाची काळजी व निर्णय याबाबत ज्ञान देण्यात आले आहे.

वरील प्रशिक्षणकामी पोलीस उप आयुक्त वाहतुक श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश बोळकोडगी, म.पो.नि. रुणाल मुल्ला, श्रे पोउपनि चंद्रकांत रघतवान, पोहवा. देविदास पाटील, पोशि मल्हारी खडतरे मपोशि अश्विनी सरब (आरएसपी टिम) यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट