खुनाचे गुन्हयातील अज्ञात आरोपी आसीफ शेखचा शोध घेवुन पुणे गुन्हे शाखेने लातुर येथुन केले जेरबंद..

0
Spread the love

पुणे

सह संपादक- रणजित मस्के

फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत अनोळखी इसमाचा मृतदेह मिळुन आला होता. मयताचे डोक्यात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेली होती. मयताची ओळख पटवली असता त्याचे नाव हनिफ मुसा शेख, वय ३० वर्षे, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे असे असल्याचे समजले.

सदर बाबत फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे दिनांक १०/०५/२०२५ रोजी गु.र.नं.९२/२०२५, मा.न्या.सं. कलम १०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. वरिष्ठांचे आदेशान्वये सदरबाबत गुन्हे शाखा युनिट ५ व ६ येथे गुन्हयाचा समांतर तपास सुरू होता वेगवेगळी पथके तयार करून अहोरात्र तीन दिवस तपास सुरू असताना गोपनिय माहितीव्दारे तसेच ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सदरचा गुन्हा हा आरोपी नामे आसिफ युनूस शेख वय २५ वर्षे, रा. गल्ली नंबर ५, सय्यदनगर, हडपसर पुणे याने केला आहे व तो गुन्हा घडल्यानंतर त्याचे मूळ गाव शास्त्रीनगर, लातूर येथे गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने दिनांक १३/०५/२०२५ रोजी सदर ठिकाणी सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पो. हवा. प्रताप गायकवाड, पो.अं.अकबर शेख यांना रवाना केले होते. सदर आरोपीतास शास्त्रीनगर, लातूर येथुन ताब्यात घेवुन गुन्हे शाखा युनिट ५ कार्यालय, पुणे येथे आणुन सखोल तपास करता आरोपीताने जुने वादाचे कारणावरून मयताचे डोक्यात दगड घालुन खुन केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीतास पुढील तपासकामी फुरसुंगी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पो.हवा बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, पो.अं. शेखर काटे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे (गुन्हे शाखा युनिट ६) तसेच स. फौज. राजस शेख, पो. हवा. तानाजी देशमुख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, विनोद निंभोरे, अकबर शेख, अमीत कांबळे, संजय दळवी (गुन्हे शाखा युनिट ५) यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट