स्था. गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी जबरी चोरी करणारा परागंदा आरोपीस केली अटक

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

सांगली शहर

गु.घ.ता वेळ

दि. ०९/०५/२०२५ रोजीचे दुपारी ०२.३० वा. चे सुमारास

अपराध क्र आणि कलम

२१४/२०२५ बी.एन.एस. कलम

३०९(६), १२६(२), ३२४(२), ३५२. ३५१(२), ३(५)

गु.दा.ता वेळ

०९/०५/२०२५ रोजी

फिर्यादी नाव

रामचंद्र राजू भोसले, रा-

६. सांगली

कोल्हापूर रोड, रामनगर गल्ली नं.

माहिती कशी प्राप्त झाली

पोह / संदीप पाटील

पोशि / संकेत कानडे

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,

मा. प्रभारी अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर

यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली सपोफौ / अनिल ऐनापुरे, पोहेकॉ संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, संजय पाटील, पोशि / संकेत कानडे, अभिजित माळकर, ऋषीकेश सदामते, अजय बेंदरे

पोशि/कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, सायबर पोलीस ठाणे

अटक दिनांक दि.१०/०५/२०२५ रोजी

आरोपी नाव व पत्ता

रेकॉर्डवरील आरोपी धनंजय शैलेश भोसले, वय २७ वर्षे, रा मॉडर्न बेकरी, भोसलेवाडा, सांगली

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दि. ०९/०५/२०२५ रोजी फिर्यादी हे दुपारी त्यांची रिक्षा घेवून घरी जात असताना धनंजय भोसले व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी मिळून फिर्यादी यांची रिक्षा रस्त्यामध्ये थांबवून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले तसेच त्यांच्या शर्टच्या डाव्या खिशात असलेले १ हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले आहे. तसेच धनंजय भोसले याने दगडाने रिक्षाची काच फोडून रिक्षाचे नुकसान केले असलेबाबत सांगली शहर पोलीस ठाणेस वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.

Scanned with CamScanner

त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील पोह/संदीप पाटील व पोशि/संकेत कानडे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी धनंजय भोसेले हा सांगली कृष्णा नदीवर असलेल्या बंधा-यावर येणार आहे.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सांगली कृष्णा नदीच्या बंधा-यावर जावून पाहिले असता एक इसम बंधा-यावर उभा असलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव धनंजय शैलेश भोसले, वय २७ वर्षे, रा मॉडर्न बेकरी, भोसलेवाडा, सांगली असे सांगितले. त्यास सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने व त्याचे साथीदार अल्ताब खलीफा, रा शामरावनगर, अभिनव हायस्कूल, सांगली व अमित शिंदे, रा शामरावनगर, सांगली यांनी मिळून सदरचा गुन्हा केलेची कबुली दिली.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाणेस खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी व एन.डी.पी.एस. केस असे गुन्हे नोंद आहेत.

सदर आरोपीस पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट