स्था. गुन्हे शाखेकडून अट्टल घरफोड्या राम मडावीकडून तालुक्यातील ४ गुन्हे उघड..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

वरूड

दिनांक ३०/०४/२०२५ रोजी पो स्टे बेनोडा हद्दीतील ग्राम आलोडा येथील फिर्यादी विमलाबाई संतोष कोडस्कर, वय ६० यांचे घरी रात्रीदरम्यान दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन जवळपास ३४ ग्रॅम सोन्याचे दागिणे आणि नगदी ३५,०००/- रु असा एकुण २,३७,०००/- रु चा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तकारीवरुन पो स्टे बेनोडा येथे अप क. ७८/२५ कलम ३०५(अ), ३३१(४) बीएनएस प्रमाणे नोंद करण्यात आला होता. अशाच स्वरुपाचे घरफोडीचे गुन्हे पो स्टे वरुड तथा शे घाट येथे देखील नोंद करण्यात आले होते.

वरुड तालुक्यात दिवसा तथा रात्री घरफोडीचे वाढते प्रमाण पाहता, वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरुड तालुक्यात दाखल घरफोडीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करत असतांना, दिनांक १०/०५/२०२५ रोजी स्थागुशा पथकास गुप्त बातमीदाकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, नमुद घरफोडी ही कोंढाळी येथे राहणार अट्टल चोर राम मडावी उर्फ स्पायडर याने केली असुन सध्या तो कोंढाळी नजीक सालई येथील त्याचे बहिणीचे घरी थांबला आहे. स्थागुशा पथक तात्काळ रवाना होवुन मिळालेल्या माहितीप्रमाणे ग्राम सलाई येथे पोहचुन राम उर्फ स्पायडर दिनेश मडावी, वय ३५, रा. सालई, जवाई विनोद कुमरे यांचे घरी, कोंढाळी जवळ, ता. काटोल, जि. नागपुर यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता, त्याने त्याचा साथीदार सागर श्रावण कुमरे, रा सालई याचे सोबत मिळुन त्याचे मित्राचे ग्रे रंगाची होंडा अॅक्टीवा गाडीचा वापर करुन वरुड तालुक्यातील ग्राम अलोडा, लोणी, लिंगा तसेच पिपळागड येथे दिवसा व रात्रीदरम्यान घरफोडी करुन सोने-चांदीचे दागिणे व नगदी रक्कम चोरी केल्याची कबुली दिली तसेच चोरीचे सोने-चांदीचे दागिणे हे ग्राम दाभा, नागपुर येथील सोनारास विकले असल्याचे सांगितले.

आरोपी राम मडावी याने दिलेल्या कबुलीवरुन तथा संबंधित सोनाराचे ताब्यातुन जप्त मुद्देमालप्रमाणे १) पो स्टे बेनोडा अप क. ७८/२५ कलम ३०५ (अ), ३३१(४) बीएनएस, २) पो स्टे बेनोडा, अप क ८०/२५ कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) बीएनएस ३) पो स्टे वरुड, अप क २८२/२५ कलम ३०५(अ), ३३१(३) बीएनएस आणि ४) पो स्टे शे घाट, अप क १३२/२५. कलम ३०५ (अ), ३३१(३) बीएनएस याप्रमाणे एकुण ०४ गुन्हे उघड करण्यात आले असुन सोनाराकडुन गुन्हयातील चोरीचे गेलेल्या मुद्देमालाप्रमाणे एकुण ४३ ग्रॅम सोन्याचा रवा / लगड, किं.अं. ३,८५,४३०/- आणि ४७५ ग्रॅम चांदीचा रवा/ लगड, किं.अं. ४६,९१५/- रु तसेच आरोपीकडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन होंडा अॅक्टीवा, किं.अं. ८०,०००/- रु असा एकुण ५,१२,३४५/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी राम मडावी यास जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशिर कार्यवाहीकरीता पो स्टे बेनोडा यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कार्यवाही मा. प्रभारी पोलीस अधिक्षक श्री पंकज कुमावत (भापोसे) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोउपनि सागर हटवार, पोहेकों बळवंत दाभणे, गजेंद्र ठाकरे, रविंद्र बावणे, भुषन पेटे, पोकों पंकज फाटे, चालक पोकों प्रशिक वानखडे तसेच सायबर येथील सागर धापड, चेतन गुल्हाणे, रितेश गोस्वामी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट