जालना शहरातील घरुफोडी करणारे 2 गुन्हेगार जेरबंद

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

जालना

पोस्टे कदीम जालना व तालुका जालना हद्दीतील 05 गुन्हे उघड करुन गुन्हयात चोरी केलेले सोने चांदी, रोख रक्कम, गुन्हा करतांना वापरलेली मोटार
सायकल असे एकुण रु. 1,41,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

जालना शहरात पोस्टे कदीम जालना हहोतोल विदयुत कॉलनी येथील शिवप्रसाद काळे यांचे घरी दिनांक 07/05/2025 रोजी ते घरी नसताना तीन अनोळखी ईसमांनी तोंडाला रुमाल बांधून त्यांचे घरी प्रवेश करुन घरातील अलमारी मधील सोन्या-चांदीचे दागिने, नगदी रोख रक्कम असा एकूण 55,000/- रुपयाचा माल घेऊन गेल्याने पोलीस ठाणे कदीम जालना येथे अनोळखी चोरटया विरुद्ध गुरनं. 171/2025 कलम 331(3) (4) BNS कावदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

नमुद गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधिक्षक जालना यांनी या बाबत सूचना दिल्याने सदर गुन्हयाचा तपास चालू असतांना दिनांक 07/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा ईसम नामे ।) तकदीरसिंग टिटूसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना याने त्याचे साथीदार नामे 1) अजय उर्फ भज्या साबळे रा. वाल्मीक नगर, गांधीनगर जालना व 2) पवनसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना यांनी केले असल्याची माहिती खात्रीलायक माहिती मिळाल्याने वरील स्टाफ यांनी यातील अजय उर्फ भज्या साबळे रा. वाल्मीक नगर, गांधीनगर जालना व 2) पवनसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर, यांना शिवाजी महाराज पुतळा जालना येवून ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी नमुद गुन्हा हा साथीदार नामे तकदीरसिंग टिदुसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना यांचे सह केल्याची कबुली दिली सदर आरोपीतांना विश्वासात घेवुन अधिक ची विचारपुस करता आरोपीतांनी पोस्टे तालूका जालना हद्दीतील खालील गुन्हे केल्याची कबुली दिली.

1) पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं. 317/2025 कलम 303(2) भान्यासं

2) पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं. 246/2025 कलम 331(4), 305 (A) भा.न्या.सं.व

3) पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं. गुरनं. 318/2025 कलम 331 (3), 331(4),305

4) पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुरनं. गुरनं. 226/2025 कलम 331(4), 305 (A) भान्यासं.

वरील गुन्हयातील दोन्ही आरोपी कडुन सोने, चांदी, मोटारसायकल रोख रक्कम असा एकुण 1,41,600/-रुपयाचा मुदेताल वरील आरोपीताकडडुन जप्त करण्यात आला आहे. वरील प्रमाणे एकूण 04 घरफोडी व 01
मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमूद आरोपीस पुढील तपासकामी कदीम जालना पोलीस ठाणे जालना यांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकणों साहेब, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि, राजेंद्र वाघ व सोबत स्वागुशाचे अर्मलदार रामप्रसाद पष्हरे, गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, ईर्शाद पटेल, सतीष श्रीवास, संदीप चिचोले, रमेश काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट