अग्नीशस्त्राने डोक्यात गोळी मारुन खून करुन पळून गेलेला आरोपीतास पंजाब येथुन अटक करण्यात खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा नयानगरला यश…

सह संपादक – रणजित मस्के
मिरा-भाईंदर

दिनांक ०३/०१/२०२५ रोजी रात्रौ ०९.१५ वा. इब्राहीम शेख, ऊमर रमजान सोलंकी व मोह. शम्सतबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनु असे गप्पा मारत असतांना सचिनकुमार साहु ऊर्फ राठोड वाने येवून मोह. शम्सतबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनु यास डोकीत गोळी मारुन त्याची हत्या करुन पळून गेलेला होता. तपासात मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम यांचेत मिरारोड परिसरात धंदा लावण्याचे पूर्व वैमनस्यावरुन वाद-विवाद असल्याने आरोपी शैफअली मन्सुरअली खान, मोहम्मद युसुफ मन्सुरअली आलम, तब्बसुन परविन मोहम्मद इस्तेकार याचे सांगण्यावरुन सचिन कुमार साहू ऊर्फ राठोड याने मयत शम्स तबरेज अन्सारी ऊर्फ सोनु यास डोक्यास डावे बाजुस पीस्टलने फायर करुन त्यास जीवानिशी ठार मारले. त्याबाबत नयानगर पोलीस ठाणे गुरनं. १ ०६/२०२५ बी. एन. एस. १०३(१), ६१(२) (अ) सह भा.ह.का. कलम ३,२५ प्रमाणे दिनांक ०४/०१/२०२५ रोजी ०३.०५ वाजता गुन्हा दाखल आहे. गुन्हयातील मुख्य पाहीजे आरोपी नामे सचिनकुमार साहु ऊर्फ राठोड हा गुन्हा दाखल झाले पासुन मिळुन येत नव्हता.
मा. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर व संवेदनशील गुन्हयातील पाहीजे आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते. वरील गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच नमुद गुन्हयातील मुख्य पाहीजे आरोपी सचिनकुमार साहू ऊर्फ राठोड हा गुन्हा केल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार झाला होता. सदर गुन्हयातील आरोपीताबाबत कोणताही ठावठिकाणा नसल्यामुळे गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. राहुल राख यांनी सदर पाहिजे आरोपीचा शोध घेणेकामी सपोनि. विजयेंद्र आंबवडे, सफौ. शकील पठाण, पोहवा. राजवीर संधु यांचे तपास पथक तयार केले. नमुद पथकाने आरोपीतबाबत संपुर्ण माहिती प्राप्त करुन त्याबाबत तांत्रीक विश्लेषण करुन आरोपीत याचे ठावठिकाणाबाबत अधिक माहिती प्राप्त केली. नमुद आरोपीत सचिनकुमार साहु ऊर्फ राठोड हा जि.भटिंडा राज्य पंजाब येथे असल्याबाबत संशय निर्माण झाल्याने नमुद पथकाने वरीष्ठांचे परवानगीने पंजाब या ठिकाणी जावून आरोपीचा स्थानिक पोलीसांच्या मदतीने शोध घेतला असता तो तलवंडी साबो जि. भटिंडा येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून मा.प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी, तलवंडी साबो, जि. भटिंडा येथे हजर करुन ट्रांन्झीट रिमांडद्वारे पुढील तपासकामी गुन्हे शाखा कक्ष-१ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. मधुकर पांडेय, मा. अपर पोलीस आयुक्त श्री, दत्तात्रय शिंदे, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्री. अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा प्रभारी पो.निरीक्षक राहुल राख, सपोनि/विलास कुटे, सपोनि / विजयेंद्र आंबवडे, पोउनि ओंकार कोवे, सफौ. शकील पठाण, पोहवा. मुस्तकीम पठाण, पोहवा. राजवीर संधु, पोहवा. सतिष जगताप, पोहवा. सुनिल गोमासे,
पोहवा. शरद पाटील, पोहवा. अनिल नागरे, पोअं. साकेत माघाडे तसेच सायबर पोलीस ठाणे, पोउनि. प्रसाद शोनलकर, सफौ. संतोष चव्हाण यांनी यशस्वी कामगिरी केली आहे.