अंमली पदार्थ विरोधी पथक पुणे २ ने धुळे, महाराष्ट्र आणि ओडीसा येथुन आलेला तब्बल ६४ किलो गांजा मुद्देमाल केला जप्त

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

आज दि.०१/०५/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे पुणे शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पुणे रेल्वे स्टेशन आउट गेट समोर १) पप्पु चक्रधर देवरी, वय ३२ वर्षे, रा. गांव कलंड, ता. रसलपुर, जिल्हा जसपुर राज्य ओरीसा २) चंदन सुभाष कुंवर, वय १९ वर्षे, रा. न्यु तरोल, सेनापती कॉलनी, गांव जगतपुर जिल्हा कटक राज्य ओरीसा यांच्या ताब्यात एकुण ०६,२४,०००/-रू.कि.चा ३० किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्यांचे विरुध्द बंडगार्डन पोस्टे गु.र.नं.१४५/२०२५, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (i) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच मागील आठवडयामध्ये दि.२२/०४/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे खडकी पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना नॅशनल टुर्स अॅन्ड ट्रॉव्हल्स, वाकडेवाडी एस.टी. स्टॅन्ड जवळ, खडकी, पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १) राकेश रूपसिंग पावरा, वय २५ वर्षे पुर्ण रा शिरपुर, दापचेपाडा, धुळे २) एक विधिसंघर्षित बालक वय १७ वर्षे रा.धुळे यांच्या ताब्यात एकुण ७,०४,०००/-रू.कि.चा ३४ किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्यांचे विरुध्द खडकी पोस्टे गु.र.नं.११५/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे. श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार नितीन जगदाळे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, सय्यद साहिल शेख, उदय राक्षे, अझिम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, निलम पाटील यांनी केली आहे.