काळेपडळ पोलीसानी पहलगाम हल्ल्याच्या अनुषंगाने लाॅज आणि हॉटेल चालक / मालकांची घेतली विशेष बैठक..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे

आज दिनांक 02/05/2025 रोजी 12.30 वा ते 1.15 वा चे दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील लॉज आणि हॉटेल मालक/चालक यांची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीस उपस्थित सदस्यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.
1)लॉज येथे रहावयास येणारे सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरला नोंद घ्यावी.
2) लॉज येथे राहावयास येणारे परदेशीय नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी.
3) लॉज मधील सर्व कामगार वर्ग यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी.
4) लॉज येथे बालकामगार कामावर ठेवू नयेत.
5) लॉजचे प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत.
6) लॉज येथे आग लागली असता तात्काळ आग विझविणे करिता फायर फायटर साहित्य लावण्यात यावेत.
7) लॉज येथील दर्शनी भिंतीवर आपत्कालीन नंबर लावण्यात यावेत.
8) लॉज समोर वाहने पार्किंग होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
9) लॉज च्या ठिकाणी संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रूम 112 तसेच काळेपडळ पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा.
येणेप्रमाणे सूचना देण्यात आले असून सदर बैठकी करिता खालील लॉजचे आणि हॉटेल मालक-चालक उपस्थित होते
1) दौलत लॉज 2) श्री लॉज 3) न्यू रॉयल लॉज 4) हर्ष लॉज 5) गौतम लॉज 6) सुयोग लॉज 7) साई सिद्धी लॉज 8) ऋतुराज लॉज 9) शनया इन लॉज 10) तत्व लॉज 11) रॉयल रेस्ट रूम 12) पृथ्वी एक्झिटिव्ह लॉज 13) माऊंटन हाय इन लॉज 14) रॉयल गार्डन रिसॉर्ट लॉज 15) आचल लॉज 16) आनंद लॉज लॉज 17) कोरंथीयन क्लब
माहिती आदरपूर्वक सादर
( मानसिंग पाटील )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
काळेपडळ पोलीस स्टेशन