एपीएमसी मार्केट मध्ये कात्रीने हल्ला.. आरोपी विराग सोनी बाजारपेठ पोलीसांच्या ताब्यात..

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

दि २७ कल्याण ठाणे

 बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि २७ रोजी सकाळी ०८.३० वा. ते ०९.०० वा. चे दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाणे' हद्दीतील 'एपीएमसी मार्केट' मधील फुल मार्केट परिसरात आरोपी नाव विराग राजकुमार सोनी' वय २१ वर्ष धंदा फुल मार्केट राह. शिवकृपा चाळ, पत्री पूल कल्याण पूर्व व मयत चमनलाल नंदलाल कारला वय ५५ वर्ष व मयताचा मुलगा नामे कार्तीक यांचे मध्ये आज रोजी यातील आरोपो नाम विगग राजकुमार सोनी' वय २१ वर्ष व मयत इसम नाव चमनलाल नंदलाल कारला वय ५५ वर्ष या दोघाचे जळगाव वरून केळीचे पानाचे पाच बंडल हे मयत विक्री करिता आले होते. त्यापैकी एक बंडल हा आरोपी याचा हाता सदरच केळीच्या पानाचे बंडल मयत इसम चमनलाल करला याने यातील आरोपीला न विचारता विक्री करीता घेवुन गेला. सदर केळीच्या पनाचे बंडल आरोपी हा मयत इसमाकडे मागायला गेला असता मयत इसमाने में नहीं दूंगा, तेरे को जो करणा है ओ कर" असे बोलल्याने सदर गोष्टीचा मनात राग धरून आरोपीत याने कात्रीने मयताच्या छातीवर, पोटावर वार करून जीवे ठार मारले आहे.

तसेच आरोपी याने मयत याचा मुलगा कार्तिकः कारला व पत्नी नितुदेवी यांनाही कात्रीने वार करून जखमी केले आहे.

सदर घटना घडल्याचे ३० मिनिटाचे आत आरोपी नाव चिराग राजकु‌मार सोनी’ वय २१ वर्ष याम पोलीस उप आयुक्त परीमंडळ ०३, कल्याण अतुल झेंडे व सहा पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे तसेच बाजारपेठ पो. स्टे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशमिग गौड पाचे मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश गाडवे पीलाम उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक/निसार तडवी, पोलीस शिपाई २५२३ विशाल राठोड पोलीस शिपाई/५५२४ अक्षय गिरी यांनी चक्कीनाका, कोळशेवाडी परीसरातून पळुन जात असताना शिताफिने, तात्काळ आरोपीला पकडून ताब्यात घेतले आहे.सदर बाबत बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. २८१/२०२५ भा.न्या.सं. १०३(१), १०९. ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब दुकले हे करीत आहेत.

आरोपीतास कठोरात कठोर शिक्षा होईल याप्रमाणे पुढील तपास चालू असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट