सुनामौका पाहून घरफोडी करणाऱ्या पांढराबोडी येथील चोरट्यांना गोंदिया पोलीसानी केले जेरबंद…

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

गोंदिया

गुन्हा उघड.. घरफोडी गुन्ह्यातील चोरीस गेलेला किंमती 1,66,400/- रुपयांचा मुद्येमाल हस्तगत-*

  याबाबत थोडक्यात हकिगत अशी की,  श्री. चंदनलाल ब्रिजलाल गजभिये राहणार- पांढराबोडी, तालुका जिल्हा-गोंदिया (व्यवसाय किरणा दुकान चालविणे ) हे परिवारासह लग्नकार्या करिता गोंदिया येथे गेले असताना दिनांक 20/4/2025 चे 19.00 वा. ते दि. 21/4/2025 चे रात्री 01.00 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यानी सुनामोका पाहून फिर्यादी यांचे राहते घराचे आतून कडी लावलेला दरवाजा उघडून  बेडरूममध्ये असलेली आलमारीचा लॉकर तोडून आलमारी तील नगदी 1,61,000/- रुपये, व सोन्याचे दागिने असा एकूण किंमती 2 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पो. ठाणे गोंदिया ग्रामीण येथे दिनांक 21/04/2025 रोजी अपराध क्र. 221/2025 कलम 305(ए ), 331 (4), भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास, अज्ञात गुन्हेगार चोरट्यांचा शोध करीत असताना पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे.... 

घरफोडी करणारे आरोपी नामे –

1) अंकेश उर्फ पांड्या मधु चव्हाण, वय 25 वर्ष

2) अरविद छनालाल भुरे, वय 44 वर्ष, रा. पांढराबोडी, ता. जि. गोंदिया

         यांना गुन्ह्याचे अनुषंगाने दिनांक 23/04/2025 रोजी ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले... नमूद जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींना गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस केली असता दोन्ही आरोपीनी वर नमूद पांढराबोडी येथे घरफोडी गुन्हा/ चोरी केल्याचे कबूल केले....दोघांकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल रोख रक्कम 1,28,900/- रुपये व पिवळ्या धातूचे दागिने वजनी 28.1 ग्रॅम किंमती 37,500/- रुपये असा एकुण किंमती 1 लाख 66 हजार 400/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे..... आरोपींना पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई, आरोपीना अटक, तपास प्रक्रिया गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत..

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक, सहा पोलीस निरीक्षक- धीरज राजूरकर, पोउपनि शरद सैदाणे,  अंमलदार राजेंद्र  मिश्रा, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजीत बिसेन, सुबोध बीसेन, घनश्याम कुंभलवार यांनी कामगिरी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट