जालना पोलीस ठाणे हद्दीत ईसमाचा खुन करणा-या आरोपी संदिप राऊत यास २ तासात स्था. गुन्हे शाखेने केले जेरबंद..

सह संपादक – रणजित मस्के
जालना

दिनांक 25/04/2025 रोजी रात्रीच्या सुमारास ईसम नामे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे रा. कन्हैया नगर जालना यास कोणीतरी अज्ञात इसमाने देऊळगावराजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळया जागेत जामवाडी शिवारात जिवे ठार मारले होते. सदर ईसमाच्या मारेकरीस तात्काळ शोध घेऊन अटक करणे बाबत मा.पोलीस अधिक्षक सो जालना यांनी श्री पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना सुचना दिले होते.
त्याअनुशंगाने श्री पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांनी सदर मारेकरीच्या शोध घेणे कामी पथक तयार करुन अटक करणे कामी आदेशित केल्याने सदर मारेकरीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, मयत नामे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे रा. कन्हैया नगर जालना वास त्याचा मित्र नामे संदीप ज्ञानेश्वर राऊत रा. कन्हैया नगर, जालना याने केला असुन तो सध्या जामवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास विचारपुस केली असता त्याने सांगितले की, आरोपी हा त्याचे भागीरथी टी हाऊसवर असतांना मयत नामे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवे रा. कन्हैया नगर जालना याने त्यास दारु पाज म्हणु लागला आरोपीने त्यास दारु न पाजल्याने दोघांमध्ये झटापटी होऊन मयताने आरोपीच्या आईवर शिवीगाळ केल्याने पागोष्टीचा मनात राग धरुन आरोपीने मयतास लोखंडी कु-हाडीने गळयावर वार करुन त्याचा खुन केला. त्यानुषंगाने पोलीस ठाणे तालुका जालना येथे आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल व मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पंकज जाधव, सहा. पोलीस निरीक्षक श्री. योगेश उबाळे, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोपाल गोशिक, रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, कैलास खाडे, जगदीश बावणे, संभाजी तनपुरे, सुधीर बाघमारे, सतिश श्रीवास, देविदास भोजणे, आक्रूर धांडगे, कैलास चेके, सोपान क्षिरसागर, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, चापोहेको गणपत पवार, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे सर्व स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.