संत निरंकारी चेरीटेबल तर्फे नालासोपारात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन संपन्न..

प्रतिनिधी-नुतन गौड
नालासोपारा
गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी नालासोपारा येथे ओसवाल नगरी येथील संत निरंकारी भवन येथे भव्य दिव्य रक्तदान शिबिर संत निरंकारी मंडळ नाशिक झोन तर्फे आयोजित करण्यात आले होते.



सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३ पर्यंत हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिक झोनचे श्री जनार्दन पाटील तसेच वसई विरार शहराचे पहीले महापौर श्री. राजीव पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी नायर हॉस्पिटल ब्लड बॅक १७५ युनिट , सर जे .जे.हॉस्पिटल ब्लड बॅक १२९ युनिट व जगजिवनराम हॉस्पिटल ब्लड बॅक १६१ युनिट असे एकुण ४६५ युनिट ब्लड दान करण्यात आले.