रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश कालगुडे यांची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा…

0
रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश (1)
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड: मानगाव न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय..

रायगडचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सुरेश कालगुडे यांची 2018 साली महाड एमआयडीसी मध्ये हत्या झाली होती.त्यामुळे रायगड मध्ये मोठी शोककळा पसरली होती.

सदरची घटना अशी की महाड तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे महाड एमआयडीसी येथील जुहारी कंपनीतील रस्त्यावर 31 डिसेंबर 2018 रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती.

घटनेतील आरोपी शिवपती सुभोगलाल पटेल हा कंटेनर चालक यांनी त्याच्या ताब्यातील कंटेनर हा दारू पिवून फिर्यादी भारत मोहन कदम यांच्यावर कंटेनर घालुन ठार मारण्याचा प्रयत्न केला व मयत सूर्यकांत उर्फ सुरेश कालगुडे यांच्या अंगावर घालुन त्यांना गंभीर जखमी करून ठार मारले.

सुरेश कालगुडे यांना जिवेठार मारल्यावर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.ए.ए पाटील यांनी भा.द.वि.कलम 302,307 नुसार गुन्हा दाखल केला होता.आणि मयत सुरेश कालगुडे यांच्या बाजुने सरकारी वकील ॲडवहोकेट जितेंद्र म्हात्रे यांनी प्रभावी युक्तीवाद करून सुरेश कालगुडे यांच्या कुटूंबाला न्याय देण्याचे काम केले आहे.

सुरेश कालगुडे यांची हत्या करणाऱ्या आरोपिंस अखेर माणगाव सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सुरेश कालगुडे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आक्रमक नेते होते.त्यांची हत्या झाल्यावर सर्वच क्षेत्रातून शोककळा व्यक्त होत होती.मात्र त्यांच्या कार्यकर्यांना आज योग्य तो न्याय मिळाला आहे हे विशेष.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट