जि.प गोखले कन्याशाळा येथील नव चाईल्ड फ्रेंडलि एलिमेंट्स च्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न

राजापुर

सुशिल जानू तांबे
राजापुर तालुक्यातील नुकत्याच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात जि.प गोखले कन्या शाळेने प्राथमिक गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता..त्याच अनुषंगाने विभागाचे नवनिर्वाचित आमदार श्री किरण जी (भैया) सामंत साहेबांना या शाळेला भेट देवून अनेक सुखसुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती.
त्याच अनुषंगाने स्थानिक आमदार श्री किरण जी (भैया) सामंत व पालकमंत्री श्री उदयजी सामंत साहेबांनी या शालेय मुलांसाठी CHILD FRIENDLY ELEMENTS अर्थात शाळेतील भिंतीवर प्राण्यांचे चित्र ,रंगीत वर्णमाला,गोष्टीचे पोस्टर,गेम्स,विविध प्रकारचे मुलांसाठी खेळाचे समान उपस्थित करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याच्या उद्देशाने या शाळेसाठी रोख रक्कम २० लाख मंजूर करून दिली.
तसेच दिनांक २१/०४/२०२५ रोजी जि.प गोखले कन्याशाळा येथील नव चाईल्ड फ्रेंडलि एलिमेंट्स च्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व सदर च्या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री राजाभाऊ रसाळ साहेब ह्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. दिपक जी नागले,शहर प्रमुख श्री सौरभ खडपे, प्रकाश कोळेकर,उमेश पराडकर,मुख्याध्यापिका सौ भटाले मॅडम,विद्यार्थी वर्ग,पालक वर्ग,शिक्षक वर्ग, उपस्थित होते.
भविष्यात ही शाळा स्मार्ट स्कूल म्हणून तयार करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करुयात,त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासन स्तरावरून,जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत चे शिवसेना तालुकाप्रमुख श्री दिपक जी नागले साहेब यांनी सांगितले.