पोलीस ठाण्याच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या हवालदाराला सन्मानचिन्ह देऊन सत्कार..

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १९ उल्हासनगर


उल्हासनगर पोलीस ठाणे मध्ये एका गुन्ह्याची नोंद गुन्हा रजिस्टर नंबर ९०४/२०२४ भा.न्या.स. कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे न्यायालय गुन्हा क्रमांक १६४६/२०२४ मधील आरोपी नाव १) वाहिद मंजूर खान वय २२ वर्ष २) राहुल अशोक सिंग परिहार वय २३ वर्षे, यांना न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दुसरे न्यायालय उल्हासनगर आर. एम. ठवरे यांनी सदर गुन्ह्यात बी एन एस एस २६४ प्रमाणे दोषी ठरवून आरोपीत यास ७ महिने साध्या कारावासाची शिक्षा व रोख रक्कम ३००० हजार रुपये दंडाची शिक्षा फर्माविण्यात आली.सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार ६५७१ भगवान पाटील नेमणुक -उल्हासनगर पोलीस ठाणे यांनी केला असुन त्यांनी सदर गुन्हयात नमुद दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्येमाल त्यांचे कडुन हस्तगत केलेला आहे. आरोपी विरूध्द सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. पोहवा/५०३९ बी. व्ही. धिर्डे, पोशि/७६६९ टि. के. महाले यांनी नमुद गुन्हयातील फिर्यादी, पंच व साक्षीदार यांना साक्षकामी न्यायालयात हजर ठेवुन त्यांचे साक्षीपुर्वी त्यांना गुन्हयाचे बाबत ब्रिफींग करून आत्मविश्वास वाढविल्याने सदर गुन्हा शाबित होवुन आरोपीस शिक्षा झाली आहे. नमुद न्यायालय पैरवी अंमलदार यांचा पोलीस ठाण्याचे वतीने वपोनि विष्णू ताम्हाणे यांनी सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ उल्हासनगर सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त, उल्हासनगर अमोल कोळी, वपोनि विष्णू ताम्हाणे, उल्हासनगर पोलीस ठाणे, पोनि गुन्हे चंद्रहार गोडसे, उल्हासनगर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा तपासीक अंमलदार पोहवा/६५७१ भगवान पाटील, सरकारी अभियोक्ता पी के धांडे, न्यायालय पैरवी अंमलदार पोहवा/५०३९ बी. व्ही. धिर्डे, पोशि/७६६९ टि. के. महाले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *