चारचाकी वाहन चोरणारा चोरटा यास भुसावळ शहर पोलीस स्टेशन कडुन अटक.

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

भुसावळ

भुसावळ शहर पोस्टे येथे दाखल गुरनं-१४६/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांची मालकीची चार चाकी वाहन महिंद्रा कंपनी ची स्कॉर्पिओ चोरीस गेली होती सदर गुन्हा दाखल झाल्या नंतर सदर प्रकरणात तांत्रिक विश्लेषण करून सदरील गुन्हा हा आरोपी नामे प्रफ्फुल गजानन गांगेकर रा भोसा रोड, यवतमाळ याने केल्या बाबत माहिती प्राप्त होताच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांचे आदेशाने एक पथक तयार करून जिल्हा यवतमाळ येथे आरोपीचे शोध घेणे कामी रवाना करण्यात आले होते. सदर पथकातील पोहेका/उमाकांत पाटील, नेमणूक एसडीपीओ ऑफीस, पोलीस शिपाई राहुल भोई नेमणुक – भुसावळ शहर पोस्टे यांनी येथे यवतमाळ येथे अवधूतवाडी पोस्टे जिल्हा, यवतमाळ येथील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांची मदत घेवून सलग तीन दिवस सदर आरोपी याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले आरोपी नामे प्रफ्फुल गजानन गांगेकर याने सदर वाहन चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्यास भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे आणून गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे अटके दरम्यान त्याने सदरील वाहन हे नागपूर येथे त्याचे साथीदार सैफुद्दीन खान रा-नागपूर यास दिले बाबत माहिती दिल्याने त्यास नागपूर येथे जावून ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आली आहे. तरी पुढील गुन्ह्याचा तपास ASI/१७७० विनोद नेवे हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री. अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री. उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे व मा. पोलीस निरीक्षक उद्धव डमाले यांचे मार्गदर्शना खाली पोहेका/उमाकांत पाटील, पोहेका/संदीप सुधाकर पालवे, पोलीस शिपाई राहुल भोई यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट