भिवंडी गुन्हे शाखा २ ने १३ लाखाचा ४३५ ग्रॅमचा चरस सह आरोपी पप्पु खाणला घेतले ताब्यात..

0
Spread the love

भिवंडी

उपसंपादक-राज पाटील

दि. १७/०४/२०२७ रोजी एक इसम चरस हा अमली पदार्थ विक्री करण्याकरिता ३२ कॉटर्स, रेशन ऑफिस जवळ, भिवंडी येथे येणार असल्याची पोशि/६४७६ उमेश ठाकुर यांना माहिती मिळाली होती. सदरच्या माहिती बाबत त्यांनी गुन्हे शाखा, घटक २, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. जनार्दन सोनवणे यांना अवगत केले असता छापा कारवाईवावत मा. वरिष्ठांकडुन रीतसर परवानगी प्राप्त केली व शासकीय पंचांना पाचारण करण्यात आले.

त्यानंतर वपोनि श्री. सोनवणे यांनी सपोनि / धनराज केदार, पोउनि/रविंद्र पाटील व पोलीस अंगलदार यांना बोलावुन मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे पंचांसमक्ष सापळा रचुन छापा कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत आरोपी मेहबूब उर्फ पप्पू अब्दुलहक खान, वय ७७ वर्ष, राह. आंबेडकर चाळ, बनेली, टिटवाळा, ता, कल्याण यास १३,०५,०००/- रुपये किमतीचा ४३५ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जवळ बाळगला असताना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याचे विरुद्ध निजामपुरा पोलिस ठाणे, गुन्हा रजि. नं. ३९२/२०२७, एन.डी.पी.एस. कायदा १९८७, कलम ८ (क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा, घटक २, भिवंडीचे पोउनि/रविंद्र पाटील हे करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहर, मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे शहर, व मा. शेखर बागडे सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शोध १, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि धनराज केदार, पोउनि/रविंद्र पाटील, सपोउनि/सुधाकर चौधरी, पोहवा/४४९० निलेश बोरसे, पोहवा /२७६१ सुनिल साळुंखे, पोहवा/२८१९ वामन भोईर, पोहवा/८३८ साबीर शेख, पोहवा/६८८७ सचिन जाधव, पोहवा /१९१३ रंगनाथ पाटील, पोहवा/६९७३ सुदेश घाग, मपोहवा /६८३३ माया डोंगरे, पोशि/६४७६ उमेश ठाकुर, चापोशि/२०९३ रविंद्र साळुंखे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट