साधूची वेशभुषा करून जेष्ठ नागरिकांकडून हातचलाखीने सोन्याची चैन घेवून फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना मानपाडा पोलीसानी केली अटक

सह संपादक – रणजित मस्के
मानपाडा


दिनांक १६/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वा. चे सुमारास फिर्यादी श्री. माघन दिवाकर जोशी, वय ७५ वर्ष हे भाजी घेवून बेटलॅन्ड पार्क जवळ, खोगी पलावा, डोंबिवली पूर्व मेथून त्यांचे राहते घरी जात असताना तीन अनोळखी इसमांनी एका पांढऱ्या रंगाचे कारमधून येवून त्यांच्यापैकी एक इसम हा साधुची वेशभुषा करून तो साधू असल्याची फिर्यादीस बतावणी करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीचे गळयातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व १० ग्रॅम वजनाची अंगठी हातचलाखीने फिर्यादीकडुन घेवुन फिर्यादीची फसवणुक केल्याबाबत तकार प्राप्त झाल्याने लागलीय यांत्रीक तपास करून गाडीचा नंबर निष्पन्न करून आरोपी नामे १) राहुल धारूनाथ चाटी उर्फ मदारी, वय २९ वर्षे, रा. गणेशपुरा, भरमाळ नगर, ता. देगाव, गांधीनगर, गुजरात, २) आशिष दिलीपनाम मदारी, वय २० वर्षे रा. मु.पो. आलोळ, अराधरोड, रामदेवजी मदीराच्या मागे, ता. आलोळ, जि. पंचमहाल राज्य गुजरात सध्या रा. जय मल्हार डॉटेल मागील झोपडपटटी, गोवेनाका, कोनगाव, ता. भिवंडी व ३) लखन आबा निकम, वय ३४ वर्षे रा. मु. पो. आडेगाव, ता. म्हावा, जि. सोलापुर सध्या रा. मु. पो. वाघोली कसेनंद, दत्तात्रय हरगुडे यांची बिल्डींग, काळुबाई मंदिराचे मागे, ता. झावेली, जि. पुणे यांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडून बतावणी करून घेतलेली १ लाख २० हजार रूपये किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार नं. एमएच ०३ सीएय ३९३२ ही जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर आरोपींना गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण श्री. अतुल शेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग श्री. सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कादबाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (का.व सु) श्री. जयपाल गिरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेश राळेभात, संपत फडोळ, सागर चव्हाण, पोलीस हवालदार/ राजेंद्रकुमार खिलारे, सचिन साळवी, सुनिल पवार, शिरीष पाटील, संजु मासाळ, विकास माळी, सुशांत पाटील, पोलीस नाईक / गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यल्लपा पाटील, पोलीस शिपाई/ घनश्याम ठाकुर, गणेश बडे, नाना चव्हाण, विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके, योगेश आडे यांचे पथकाने केलेली आहे