राज्य स्थरीय मंथन स्पर्धा परीक्षेत कार्तिक चांदोरकर याने केले यश संपादन.

प्रतिनिधी:-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-माणगाव तालुक्यातील चांदोरे येथील रहिवासी तसेच र. का. गांधी प्रार्थमिक विद्यामंदिर गोरेगाव येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असतांना मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याचे विद्यालयातील शिक्षकांचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणिताची आवड निर्माण करणे आणि त्यांचे कौशल्य ओळखणे हे आहे.विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते.
विज्ञान आणि गणिताशी संबंधित विषयांमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.पत्रकार नंदकुमार चांदोरकर यांनी आपल्या मुलामध्ये हेच कौशल्य ओळखून दर वर्षी मंथन परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देत असतात.
भविष्यातील अनेक स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी आणि दर्जा ओळखला जातो कु. कार्तिक नंदकुमार चांदोरकर याने मंथन राज्यस्थरीय स्पर्धा परीक्षेत २०२५ पास होऊन राज्यात २० वा नंबर, जिल्यात १५ वा तर केंद्रात ३ रा नंबर काडून चांदोरे रोहिदासवाडीचे नावं उंचावले आहे.गेल्यावर्षी मंथन जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षेत सुद्धा राज्यात उत्तम प्रकारे यश संपादन केले होते