मेफोड्रोन (एम.डी.) ” अंमली पदार्थ सराईत इराणी आरोपीताकडून पोलिसांनी केला हस्तगत.

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १७ कल्याण ठाणे
पोलीस उपायुक्त परिमंडल ०३
मधील खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२१/२०२५, अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) प्रमाणे पोलीस उपायुक्त परि. ०३, कल्याण यांचे विशेष कारवाईचे पथकाचे अधिकारी व अंमलदार तसेच खडकपाडा पोलीस ठाणेतील पोलीस निरीक्षक गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार असे पोलीस उपायुक्त परि. ०३, कल्याण यांचे आदेशानुसार खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत अटाळी परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विकी करणारे पेडलर व अभिलेखावरील फरार आरोपीचा शोध घेवून त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे करीता खाजगी वाहनांवरून प्रतिबंध गस्त करण्या करीता रवाना झाले.सदरचे पथक दिनांक १६/०४/२०२५ रोजी १८.१५ वा. चे सुमारास बंदरपाडा कडून शिवमंदिरकडे जाणाऱ्या कच्या गावठाण रोडवर, बंदरपाडा, कल्याण प. जि. ठाणे या ठिकाणी आले असता सदर ठिकाणी पोलीस पथकास रोडचे कडेला उभ्या असलेल्या एका काळया रंगाची सुझुकी कंपनीची ऍक्सेस स्कुटी क्रमांक एम.एच. ०४ के.जे. ८८६४ स्कुटीवरील इसमाच्या हालचाली संशयीत बाटल्या पाहून पोलीस पथकाने त्याचा पंचासमक्ष अंगझडती पंचनामा करण्यात आला असता त्याचे ताब्यातुन १) १५ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम. डी.), अंमली पदार्थ. अं.कि.रु. ३०,०००/- हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्या असुन सदर इसम नामे हाशमी जाफर हुसैन जाफरी, वय ३३ वर्षे, रा. ठि. ५४, जाणु पाटील चाळ, इराणी नगर, आआंबिवली रेल्वे स्टेशग जवळ, अटाळी, ता. कल्याण, जि. ठाणे यास खडकपाडा पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आली व पुढील तपास चालु पोलीस करत आहे.
अटक अरोपीतावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल .
१) गु र क ७१२/१४ कलम ३९४,३४ भादवी
म. फु. चौक पोलीस ठाणे
२) गु र क ६८१/१५ कलम ३०७,३५३,३४ भादवी
म. फु. चौक पोलीस ठाणे
३) गुर क २१/२०१६ कलम ३९४,३४ भादवी सह कलम ०३ सदरची कामगिरी अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त. परिमंडळ ०३, कल्याण,
मोक्का मानपाडा पोलीस ठाणे
कल्याणजी घेटे, सहायक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग, तसेच डॉ. अमरनाथ वाघमोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. विजय नाईक नेम. महात्मा फुले पोलीस ठाणे, कल्याण प. स.पो.नि. अनिल गायकवाड, स.पो.उपनिरी. जितेंद्र ठोके, पो.शि. २३२३ अमित शिंदे, पो.शि. २८८९ खुशाल नेरकर, पो.शि. ७६५३ राहुल शिंदे मा. पोलीस उप आयुक्त साो. परि. ०३, कल्याण विशेष कारवाई पथक, तसेच खडकपाडा पो. ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी स.पो.नि. विजय गायकवाड, अंमलदार पो. शि.क्र. ८३८१ अनंत देसले, पो.शि.क्र. ८०५३ सतिष मुपडे यांनी केली आहे.