अमरावती ग्रामीण जिल्हयातील २२ पोलीस स्टेशनचा ४७ लाख रूपयाचा दारूबंदीचा मुद्देमाल केला नष्ट..

सह संपादक – रणजित मस्के
अमरावती



मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांचे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय अन्वये क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी १०० दिवसाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत पोलीस स्टेशनला बऱ्याच कालावधी पासुन प्रलंबित असलेल्या मुद्देमाल निर्गतीची विशेष मोहीम अमरावती ग्रामीण जिल्हयात राबविण्यात येत असुन त्याअंतर्गत मा. पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी आढावा घेतला असता त्यांचे निर्देशनास आले की, अमरावती ग्रामीण जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशनला १००० रूपयावरील दारूबंदी अधिनियमाखालील दारूचा मुद्देमाल बऱ्याच प्रमाणात प्रलंबित आहे त्यावरून पोलीस स्टेशनला प्रलंबित असलेला दारूबंदीच्या गुन्हयातील मुद्देमाल कायदेशीर प्रकीया राब्खुन नाश करणे बाबतचा आवेश अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा. यांना दिला.
त्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क अमरावती यांच्याशी २२ पोलीस स्टेशनचा मुद्देमाल नष्ट करण्या बाबतचा प्रस्ताव सादर केला असता राज्य उत्पादन शुल्क विभाग अमरावती यांनी सदर प्रस्तावास मा. जिल्हादंडाधिकारी यांचे कडून मंजुरी घेवून मुद्देमाल नष्ट करण्याची तारीख १३.०४.२०२५ हि नियोजित केली. नियोजित दिनांक १३.४.२०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री. प्रशांत वानखडे व श्री. संतोष वायाळ यांचे उपस्थितीत अमरावती ग्रामीण घटकातील पोलीस स्टेशन अचलपुर येथील १२ गुन्हे, परतवाडा ३० गुन्हे, चांदुर बाजार ४० गुन्हे, शिरजगाव २२ गुन्हे, सरमसपुरा ७ गुन्हे, मोर्शी ३० गुन्हे, बेनोडा ५३ गुन्हे, शिरखेड १२ गुन्हे, नांदगाव खंडेश्वर १० गुन्हे, माहुली १८ गुन्हे. खोलापुर ४३ गुन्हे, कुन्हा २० गुन्हे, चांदुर रेल्वे ६ गुन्हे, तळेगाव ४६ गुन्हे, मंगरूळ दस्तगिर २१ गुन्हे, येवदा १७गुन्हे, खल्लार २२ गुन्हे, अंजनगाव ६३ गुन्हे, प्रथोट ८ गुन्हे, रहिमापुर १० गुन्हे, धारणी ३३ गुन्हे, चिखलदरा २३ गुन्हे असे जिल्हयातील एकुण ५४६ गुन्हयातील देशी विदेशी एकूण ६९,४१२ शिश्या ज्यामध्ये देशी दारू १८० एम.एल. च्या २०९८८ देशी ९० एम एल च्या ४५८८४ व इतर विदेशी दारूच्या २५४० शिश्या एकुग किमंत अंदाजे ४७लाख ७४ हजार रूपयाची दारू नष्ट करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा. जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाने मा. पोलीस अधिक्षक श्री विशाल आनंद (भा.पो.से.), मा अपर पोलीस अधिक्षक श्री पंकज कुमावत (भा.पोसे.) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व संबधित पोलीस स्टेशन प्रभारी व हेडमोहरर यांनी पार पाडलो.