महिलेच्या पर्समधुन १ लाख ४० हजार रुपयाचे दागीने चोरणारे चोरटे मौजपुरी पोलीसांनी केले जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के
जालना
सविस्तर हकीकतः-
पोलीस ठाणे मौजपुरी जि.जालना येथे फिर्यादी नामे दत्ता सर्जेराव मापारे रा. सातोना ता. परतुर जि. जालना ह.मु. जालना यांनी तक्रार दिली कि, फिर्यादी हे दिनांक 11/04/2025 रोजी 18.40 वाजता सुमारास मुळगाव सातोना येथुन येत असतांना त्यांना भुक लागली म्हणुन ते व त्यांची पत्नी हे विरेगाव येथील साई राजस्थानी स्वीट मार्ट येथे नाष्टा करण्यासाठी थांबले. नाष्टा करत असतांना त्यांच्या पत्नीने तिच्या हातातील पर्स ही टेबलवर ठेवली व नाष्टा करुन तेथुन निघुन गेले त्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या पत्नीला लक्षात आले कि, त्यांची पर्स ही विरेगाव येथील साई राजस्थानी स्वोटमार्ट दुकानात विसरुन राहीली. तेंव्हा फिर्यादी व त्यांची पत्नी हे परत सदर दुकानात आले तेंव्हा त्यांना त्यांची पर्स मिळुन आली. परंतु सदर पर्स मध्ये ठेवलेले 01 लाख 40 हजार रुपये किंमतीचा एक तोळा वजनाचे एक जोडी सोन्याचे फुल व झुंबर व एक तोळयाची एक सोन्याची पोत असे मिळून आले नाही, त्यावरुन पोलीस ठाणे मौजपुरी जि. जालना येथे फियांदी यांच्या फिर्यादीवरुन कलम 303(2) भा.न्या. सं प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेच मा. पोलीस अधीक्षक साहेब, जालना, मा. अपर पोलीस अधीक्षक साहेब, जालना यांनी गुन्हे बैठकोमध्ये मालाविरुध्दचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत वरीष्ठांनी दिलेल्या सूचना प्रमाणे तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी जाऊन फियांदी यांचेकडून सविस्तर घटनाक्रम समजावुन घेतला त्यानंतर गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी नामे 1) सुरेश नामदेव पवार रा. कोठो बेलोरा ता. जिंतुर जि. परभणी 2) अजय रमेश राठोड रा. विरेगाव तांडा ता.जि. जालना यांना ताब्यात घेतले व त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांची गुन्हा केल्याची कबुली दिली असून आरोपीतांच्या ताब्यातुन फिर्यादी यांचा चोरी गेलेला 01 लाख 40 हजार रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगीरी ही श्री. अजयकुमार बंन्सल साहेब, पोलीस अधीक्षक, जालना, श्री. आयुष नोपाणी साहेब, अपर पोलीस अधीक्षक, जालना, श्री दादाहरी चौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग परतुर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.मिथुन घुगे, सहा. पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो स्टे मौजपुरी, पोउपनि श्री. विजय तडवी, सफौ चंद्रकांत पवार, पोअं/प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, पोह/दिलीप गोडबोले, भास्कर वाघ, दादासाहेब हरणे, भगवान खरात, प्रशांत म्हस्के व होमगार्ड अंकुश घाटे यांनी केली आहे.