पायी जाणारे नागरीकांना विनाकारण धक्का मारुन पाया पडण्याचे बहाण्याने खिशातील पैसे चोरणा-या दोन सराईतांना केले जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
दि.०९/०४/२०२५ रोजी साईबा टी स्टॉलच्या बाजूस, शाहू बैंक चौक, धनकवडी पुणे येथे फिर्यादी हे पायी जात असताना त्यांना दोन अनोळखी इसमांनी गाडीवर येवुन विनाकारण धक्का मारुन चुक झाली माफ करा असे म्हणुन त्यांचे पाया पडण्याचे बहाण्याने खिशातील ३०,०००/- रु. चोरुन नेले म्हणुन दोन इसमांविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१३६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी सपोनि, सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने आरोपी नामे १) आस्लम इस्माइल शेख, वय २१ वर्षे रा. विल्डींग नं.१, फ्लॅट नं.२०६, नवीन म्हाडा, सातवाडी, हडपसर पुणे २) साद अकबर पठान, वय २३ वर्षे रा. गल्ली क्रमांक ७ ए वेस्टर्न बेकरी गल्ली, सय्यदनगर, हडपसर, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवुन फिर्यादी यांना धक्का देवुन त्यांचे पाया पडण्याचे बहाण्याने त्यांचे खिशातील ३०,०००/-रु.चोरुन नेले नमुद आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली गाडी जप्त करुन त्यांना दाखल गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उपायुक्त परि.२, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पो.उप निरी बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, बजरंग पवार, सागर सुतकर, किरण कांबळे, योगेश ढोले, महेश भगत, अमित पदमाळे, बालाजी केंद्रे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, खंडु शिंदे यांनी केली आहे.