अमरावती जिल्हयात महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सिमेवर गावठी हातभट्टी दारु विरुध्द धडक कारवाई

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती

आगामी काळात जिल्हयात साजरा होणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे सारख्या सार्वजनिक उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याचेदृष्टीने तसेच अमरावती ग्रामीण जिल्हयाचे सिमेलगत असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील पो.स्टे. भैसदेही तसेच पो.स्टे. आठनेर सिमेमधुन अवैधरित्या गावठी हातभट्टी दारुची अमरावती ग्रामीण जिल्हयात अवैधरित्या वाहतुक व विक्री होत असल्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सदर प्रकारास त्वरीत आळा घालण्याबाबत मा.श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी अधिनस्त प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.

अवैध दारू विक्री व निर्मातीचे अनुषंगाने खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

दि.१०/०४/२०२५ रोजी पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी व मध्यप्रदेश राज्यातील पो.स्टे. आठनेर यांनी संयुक्त कारवाई करीत मध्यप्रदेश हद्दीत हिरादेही गावाजवळील चारघड नदी पात्रात छापा मारुन २३ डूम मोहा सडवा कि.अं.४,६०,०००/-रु तसेच दारु गाळण्याचे साहीत्य कि.अं.२३,०००/- रु असा एकूण ४,८३,०००/- रु चा हातभट्टी दारु निर्मातीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असुन पुढील कारवाई आठनेर पोलीस करीत आहे.

२) पो.स्टे. शिरजगाव व मध्यप्रदेश राज्यातील पो.स्टे. भेसदेही यांनी संयुक्त कारवाई करीत मध्यप्रदेश हद्दीतील खोमई गावाजवळील सुपाळा मेघा नदी पात्रात छापा मारुन ४० रबरी ट्युब मोहा सडवा कि. अं.८०,०००/-रु तसेच दारु गाळण्याचे साहीत्य कि. अं.३०,०००/- रु असा एकुण १,१०,०००/- रु चा हातभट्टी दारु निमीतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून पुढील कारवाई भैसदेही पोलीस करीत आहे.

३) पो.स्टे. दत्तापुर हहीत दत्तापुर पोलीसांनी गावठी हातभट्टी दारू विरूध्द ०५ प्रकरणात एकूण ६८ लोटर गावठी दारू, ४१० ली. मोहा सडवा असा एकुण ५८,२००/- रूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

४)

पो.स्टे. चांदुर रेल्वे हहील चांदूर रेल्वे पोलीसांनी गावठी हातभट्टी दारू विरूध्द ०१ प्रकरणात एकूण ९० लीटर गावठी दारू, १,०५० ली. मोहा सडवा असा एकुण १,१९,५००/- रूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे

दि.१०/०४/२०२५ रोजी वरीलप्रमाणे पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, दत्तापुर, चांदुर रेल्वे पोलीसांचे ०८ कारवाईत एकुण ११,७०,७००/-रु चा हातभट्टी दारु व दारू निर्मातीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

याच मोहीमेअंतर्गत अमरावती ग्रामिण जिल्हयात दि.०१/०४/२०२५ ते १०/०४/२०२५ पावेतो अवैध दारू विक्री, वाहतुक विरूध्द विशेष मोहीम राबविण्यात आली असुन सदर मोहीमे दरम्यान एकुण १७९ प्रकरणामध्ये, १८३ आरोपी विरूध्द कारवाई करून ४,७६,६६०/- रूचा अवैध दारू व इतर साहीत्याचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., मा. श्री. पंकज कुमावत, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. शुभम कुमार, सहायक पोलीस अधिक्षक, अचलपुर, श्री. अनिल पवार, उप-विभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे यांचे मार्गदर्शनात पो.नि.गिरिष ताथोड, ठाणेदार, पो.स्टे. दत्तापुर, पो.नि. अजय आखरे, ठाणेदार, पो.स्टे. चांदुर रेल्वे, स.पो.नि.श्री. उल्हास राठोड, ठाणेदार पो.स्टे. ब्राम्हणवाड़ा बडी, स.पो.नि.श्री. महेन्द्र गवई, ठाणेदार पो.स्टे. शिरजगाव कसबा यांचे नेतृत्वात स्थानिक पोलीस पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट