अमरावतीत ग्रामीण भागात रेती तस्करी विरूध्द स्था. गु.शा. पथकाची धडक कारवाई

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती

अमरावती ग्रामीण जिल्हयात सुरु असलेल्या चोरटया रेती/वाळु तस्करीवर आळा घालण्याबाबत मा.श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी अधिनस्त सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे. दि.१०/०४/२०२५ रोजी श्री. शुभम कुमार, सहायक पोलीस अधिक्षक, अचलपुर व स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण पथकांव्दारे विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे अवैध रेती वाहतुक व चोरी विरुध्द कारवाई करण्यात आली.

१) पो.स्टे. परतवाडा

श्री. शुभम कुमार, सहायक पोलीस अधिक्षक, अचलपुर यांचे पथकाने पो.स्टे. परतवाडा हद्दीत आरोपी नामे राजेश प्रल्हादराव धुळे, वय ३९ रा. हनवतखेड, ता. अचलपुर याचे ताब्यातील ट्रक टाटा क्र.एम.एच.२७ डी.टी. ००१२ यास नाकाबंदी दरम्यान थांबवून तपासणी केली असता सदर वाहनामध्ये विना परवाना १२ ब्रास वाळु कि.अं.१,२०,०००/- रु मिळून आली वरुन वाहनासह एकुण मुद्देमाल ३६,२०,०००/- रु चा जप्त करुन पो.स्टे. परतवाडा येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच

२) पो.स्टे. अचलपुर

सदर पथकाने पो.स्टे. अचलपुर हद्दीत आरोपी नामे संजय बिसन मोहनकर, रा. अचलपुर याचे ताब्यातील ट्रक अशोक लीलैन्ड क्र.एम.एच.२७ बि.एक्स. ९५८९ यास नाकाबंदी दरम्यान थांबवुन तपासणी केली असता सदर बाहनामध्ये विना परवाना ०८ ब्रास वाळु कि.अं.८५,०००/- रु मिळून आली वरुन वाहनासह एकूण मुद्देमाल ३५,८५,०००/- रु चा जप्त करुन पो.स्टे. अचलपुर येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

३) पो.स्टे. सरमसपुरा

पो.स्टे. सरमसपुरा हद्दीत ग्राम रासेगाव दरम्यान स्था.गु.शा.चे पथकाने नाकाबंदी केली असता आरोपी नामे शाम सदाशिव सातपुते, वय २२ वर्ष रा. अचलपुर हा त्याच्या ताब्यातील महीन्द्रा कंपनीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीत अवैधरित्या रेती अंदाजे कि. ७०००/- रु ची चोरुन वाहतुक करतांना मिळुन आला वरुन रेती व ट्रॅक्टर असा एकुण ५,०७,०००/- रु चा माल जप्त करुन पो.स्टे. सरमसपुरा येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

४) पो.स्टे. शिरखेड

पो.स्टे. शिरखेड हद्दीत ग्राम राजुरवाडी दरम्यान स्था.गु.शा.चे पथकाने नाकाबंदी केली असता आरोपी नामे अनिल अंबादास उईके, वय ४५ वर्ष रा. कवठाळ, ता. मोशी हा त्याच्या ताब्यातील फोर्स बलवान कंपनीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीत अवैधरित्या रेती अंदाजे कि. ७०००/- रु ची चोरुन वाहतुक करतांना मिळून आला वरुन रेती व ट्रैक्टर असा एकुण ५,०७,०००/- रु चा माल जप्त करुन पो.स्टे. शिरखेड येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

५) पो.स्टे.मोशी

पो.स्टे. मोशी हद्दीत ग्राम मनीमपुर दरम्यान स्था.गु.शा.चे पथकाने नाकाबंदी केली असता आरोपी नामे रम्मू मुंगीलाल उईके, वय ३५ वर्ष रा. मनीमपुर, ता. मोशी हा त्याच्या ताब्यातील सोनालीका कंपनीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीत अवैधरित्या रेती अंदाजे कि. ७०००/- रु ची चोरुन वाहतुक करतांना मिळून आला वरुन रेती व ट्रॅक्टर असा एकुण ५,०७,०००/- रु चा माल जप्त करुन पो.स्टे. मोशी येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

६) पो.स्टे.मोशी

पो.स्टे. मोशी हद्दीत ग्राम उदखेड दरम्यान स्था.गु.शा.चे पथकाने नाकाबंदी केली असता आरोपी नामे प्रीतम उईके, वय २३ वर्ष रा. उदखेड, ता. मोशी हा त्याच्या ताब्यातील स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीत अवैधरित्या रेती अंदाजे कि. ७०००/- रु ची चोरुन वाहतुक करतांना मिळून आला वरुन रेती व ट्रॅक्टर असा एकूण ५,०७,०००/- रु चा माल जप्त करुन पो.स्टे. मोशी येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

७) पो.स्टे. नांदगाव ख.

पो.स्टे. नांदगाव खंडेश्वर हद्दीत ग्राम शिरपुर दरम्यान स्था.गु.शा.चे पथकाने नाकाबंदी केली असता आरोपी नामे आकाश महादेव शेळक, वय ३० वर्ष रा. शिरपुर, ता. नांदगाव खंडेश्वर हा त्याच्या ताब्यातील कुबोट कंपनीच्या ट्रॅक्टरचे ट्रॉलीत अवैधरित्या रेती अंदाजे कि.६०००/- रु ची चोरुन वाहतुक करतांना मिळून आला वरुन रेती व ट्रॅक्टर असा एकूण ५,०६,०००/- रु चा माल जप्त करुन पो.स्टे. नांदगाव खंडेश्वर येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वरीलप्रमाणे स्था.गु.शा. चे पथकामार्फत अवैध रेती वाहतुक विरुध्द एकुण ०५ प्रकरणात ०५ ट्रॅक्टर ट्रॉलीसह रेती अंदाजे ०५ ब्रास तसेच श्री. शुभम कुमार, सहायक पोलीस अधिक्षक, अचलपुर यांचे पथकाव्दारे ०२ प्रकरणात ०२ वाहनांसह रेती अंदाजे २० ब्रास अश्या एकुण ०७ प्रकरणात एकुण ९७,३९,०००/-रु चा माल जप्त करुन आरोपीतांविरुध्द चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., मा.श्री. पंकज कुमावत, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा, श्री. शुभम कुमार, सहायक पोलीस अधिक्षक, अचलपुर यांचे मार्गदर्शनात पो.नि.श्री. किरण वानखडे, यांचे नेतृत्वात पो.उप.नि. सागर हटवार, मो. तसलीम, मूलचंद भांबुरकर व स्था.गु.शा. येथील पोलीस यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट