रामनगर येथील व्यापाऱ्याचे फर्निचर चे दुकान फोडुन इलेक्ट्रानिक सामान व ईतर साहित्य चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखा व मौजपुरी पोलीसांनी जेरबंद..

0
WhatsApp Image 2025-04-12 at 7.55.15 AM (1)
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

जालना

सविस्तर हकीकतः-

पोलीस ठाणे मीजपुरी जि. जालना हद्दीतील व्यापारी फिर्यादी नामे ज्ञानेश्वर सर्जेराव मुळे रा. भालगाव ता. अंबड जि. जालना ह.मु. मार्कडेय नगर, जालना यांनी तक्रार दिली कि, फिर्यादी हे दिनांक 08/04/2025 रोजी 21.00 वाजता सुमारास त्यांचे माऊली फर्निचर व ईलेक्ट्रानिक नावाचे दुकान बंद करुन घरी निघुन गेले असता मध्यरात्री सुमारास अनोळखी चोरटयांनी दुकानाच्या शेडचे मागील बाजुचे पत्र्याचे स्कु काढून पत्रे उचकाटुन दुकानात प्रवेश करुन फर्निचर व इलेक्ट्रानिक साहित्य असा मुद्देमाल चोरुन नेला आहे. त्यावरुन पोलीस ठाणे मौजपुरी जि. जालना येथे कलम 334 (1).305 भा.न्या.से प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हा उघड करुन आरोपो निष्पन्न करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक साहेच, जालना यांनी तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव साहेब, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांच्या सुचने प्रमाणे व मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघड़किस करुन आरोपी अटककरणेबाबत सुचना दिल्या त्यानुसार वरीष्ठांनी दिलेल्या सूचना प्रमाणे गुन्हयाचे घटनास्थळी तात्काळ फिंगर प्रिन्ट व डॉग युनिट यांना पाचारण केले तसेच फिर्यादी यांच्या फर्निचर दुकानातील सी.सी.टि.व्ही फुटेज हस्तगत करुन पाहणी करून गुन्हयात मुद्देमाल चोरुन घेऊन जाण्याकरीता वापरलेली बोलेरो पिकअप व आरोपी बाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेउन पो.स्टे मौजपुरी चे सपोनि श्री. मिथुन पुगे व स्थानिक गुन्हे शाखा येथील श्री. राजेंद्र वाघ यांच्या पथकासह गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी नामे दिलीप दगडूबा झिने रा.लोणगाव ता. भोकरदन जि. जालना यास ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याचे सदर गुन्हा हा आरोपी नामे ।) विनोद काळे 2) बळीराम फुके दोघे रा.लोणगाव ता. भोकरदन जि. जालना यांच्या मदतीने केल्याचे कबूल केले असून गुन्हयात चोरी केलेला मुद्येमाला बाबत विचारपुस करता सदर आरोपीने गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमाला पैकि एल.ई.डी. टि.व्ही 32 इंच, सूर्या कंपनीच्या गॅस शेगड्या, मिक्सर व गुन्हयात वापरलेला बोलेरो पिकअप असा एकूण 07 लाख 75 हजार रुपयाचा सविस्तर पंचनामा करुन मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच उर्वरीत मुझेमाल हा त्याचे ईतर फरार साथीदार यांच्याकडे असल्याचे सांगत असुन नमूद गुन्हयात इंतर फरार आरोपीतांचा शोध घेणे चालु असुन सदर गुन्हयातील पूर्ण गेला माल हस्तगत करुन व आरोपी अटक करुन गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.

सदरची कामगीरी ही श्री. अजयकुमार बंन्सल साहेब, पोलीस अधीक्षक, जालना, श्री. आयुध नोपाणी साहेब, अपर पोलीस अधीक्षक, जालना, श्री. दादाहरी चौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग परतूर तसेच श्री. पंकज जाधव साहेब, पो.नि. स्थागुशा, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगीरी ही श्री. मिथुन घुगे, सहा. पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो.स्टे मौजपुरी, सपोनि श्री. योगेश उवाळे, स्थागुशा, जालना, सपोनि डिगांबर कठाळे, फिंगर प्रिन्ट शाखा, जालना, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आहेप, ईशाद पटेल, कैलास खार्ड, रमेश काळे, सागर बावीस्कर, स्थागुशा, जालना, गणेश वाघ, राजेंद्र राव, रवि खलसे फिंगर प्रिन्ट शाखा, जालना व ज्ञानोबा बिरादार, संजय राऊत, दादासाहेब हरणे, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे पो.स्टे मौजपुरी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट