जिल्हा अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे वतीने पोलीस स्टेशन मोर्शी येथे बेवारस/क्षतिग्रस्त वाहनाचा जाहिर लिलाव

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती

पोलीस स्टेशन मोर्शी जिल्हा अमरावती ग्रामीण येथे बऱ्याच वर्षापासुन बेवारस / क्षतिग्रस्त भंगार दुचाकी असे एकुण १४५ वाहनाचे दिनांक १३/०४/२०२५ रोजी सकाळी ०८.०० वा. पोलीस स्टेशन मोर्शी येथे मा. उपविभागीय अधिकारी, उपविभाग मोर्शी जिल्हा अमरावती यांचे आदेशाने जाहिर लिलावाची प्रक्रीया पार पडणार आहे. सदर वाहने हे RTO यांचे नियमा प्रमाणे स्क्रेप म्हणून त्याची किंमत आकारलेली आहे. सर्व वाहने पोलीस स्टेशन मोर्शी येथे परिक्षण/निरीक्षण करण्याकरीता उपलब्ध आहे. तसेच लिलावा संबंधीत असलेल्या अटि व शर्ती आणि वाहनाची यादी अशी सविस्तर माहिती पोलीस स्टेशन मोर्शी येथे उपलब्ध आहे. लिलावामध्ये सहभाग घेणाऱ्या व्यवसायकांनी त्यांचेकडे कायदेशीर गुमास्ता (भंगार दुकानाचा परवाना) जि.एस.टी. नंबर व आधार कार्ड व पॅनकार्ड व इतर संबंधीत आवश्यक कागदपत्राच्या मुळ व छायांकित प्रती बाबत पुर्तता केल्यावर त्यांना लिलावामध्ये सहभागी होता येईल. लिलावात सहभागी होण्याकरीता अमानत रक्कम म्हणुन ५०,०००/- रुपये (अक्षरी पन्नास हजार रुपये) जमा करण्याकरीता पोलीस स्टेशन मोर्शी यांचेशी संपर्क करुन दिनांक १३/०४/२०२५ चे १०.०० वा. पावेतो जमा करावी. सदरची अमानत रक्कम जमा केल्यानंतर अटी व शर्तीचे अधिन राहुन लिलावामध्ये सहभाग घेता येईल. सदर लिलाव कोणतेही कारण न देता रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार कार्यालयानक राखून ठेवलेला आहे.

अधिक माहिती करीता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, ठाणेदार पो.स्टे. मोर्शी, मो.नं. ९९२३०४२५६५, श्रेणी पोउपनि अरुण लांडे, पो.स्टे. मोर्शी, मो.नं.७३८५४६७०३६ यांचे सोबत संपर्क करावा.

टिप: सदर लिलावामध्ये असलेले वाहने व त्याचे साहित्य इंजीन व चेचिस क्रमांक उपयोगात आणुन वापरता येणार नाही. सदर वाहनाचा स्क्रेप (भंगार) म्हणुन लिलाव करण्यात येत आहे. तसेच लिलावात जास्तीत जास्त बोली लावुन वाहने खरेदी करणाऱ्याला सदर वाहनाचे इंजिन जागेवर कापुन (कट) करुन तसेच इंजिन नंबर व वेचिस नंबर घासुन खोडण्याची जबाबदारी खरेदीदाराची राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट