मोबाईल चोरीच्या गुन्हयांत आरोपीत अटक व २ गुन्हे उघड..

सह संपादक – रणजित मस्के
मानपाडा
मानपाडा पोलीस ठाण्यांचे हददीत मिलापनगर, डोंबिवली पुर्व येथे राहणारे श्री. ओमकार जगन्नाथ पवार हे दिनांक २४/०३/२०२५ रोजी २३.४५ वा सुमारास पोटोबा हॉटेलजवळ, मिलापनगर, डोंबिवली पुर्वं पायी चालत जात असताना आरोपीत यांनी फिर्यादीचे पाठीमागे येवुन त्यांचे हातातील २०,०००/- रू किमंतीचा अॅपल कंपनीचा मोबाईल हिसकावुन चोरी करून नेले बाबत फिर्यादी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यांत दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजी नंबर ३१९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळ्या टिम तयार करण्यांत येवुन गुन्हयांतील आरोपीत यांचा सर्वोत्तपरी शोध घेण्यांत आला. गुप्त बातमीदार तसेच आरोपीताचे वर्णना नुसार आरोपीताचा शोध घेण्यांत येत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गुप्तबातमी वरून त्यांनी दारूफला मस्जिद जवळ, रेतीबंदर रोड, गोविंदवाडी, कल्याण भागात सापळा रचला असता एक इसम मोटार सायकलवर आला असता त्यांचा संशय आल्यांने त्यांस जागीच पकडुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांने गुन्हयांची कबुली दिली असुन त्यांने मानपाडा पोलीस ठाण्यांचे हददीत त्यांने साथीदाराचे मदतीने मोबाईल हिसकावुन चोरीचे गुन्हे केल्यांची कबुली दिली. सदर गुन्हयांत आरोपीत नामे हंजला लियाकत खान, वय २५ वर्षे, रा. रूम नं ७, निसार कुवारी चाळ, दारूल फल्लह मस्जीद जवळ, रेतीबंदर रोड, गोविंदवाडी, कल्याण प. यास अटक करण्यांत आलेली असुन सदर आरोपीत यांचेकडुन २ मोबाईल फोन, एक मोटार सायकल असा एकुण ९६,०००/- रू किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यांत आलेला आहे. नमुद आरोपीत यांचा साथीदार यांचा शोध घेण्यांत येत आहे. नमुद आरोपीतांकडुन मानपाडा पोलीस ठाणे हददीतील ०२ मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. नमुद आरोपीत यांचे विरूध्द यापुर्वी मुंब्रा पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस ठाणे, खडकपाडा पोलीस ठाणे, महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे ०४ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण श्री. संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण श्री अतुल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग श्री सुहास हेमाडे यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रामचंद्र चोपडे, पोलीस निरीक्षक (का व सु) श्री. जयपालसिंह गिरासे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संपत
फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेश राळेभात, सपोनि/सागर चव्हाण, पोहवा/राजकुमार खिलारे, पोहवा/सचिन साळवी, पोहवा/शिरीष पाटील, पोहवा/सुनिल पवार, पोहवा/संजु मासाळ, पोहवा/विकास माळी, पोहवा/सुशांत पाटील, पोना/यल्लापा पाटील, पोना/कृष्णा बोराडे, पोना/गणेश भोईर, पोशि/अशोक आहेर, पोशि/विजय आव्हाड, पोशि/गणेश बडे, पोशि/घनश्याम ठाकुर, पोशि/नाना चव्हाण, पोशि/सोपान शेळके, पोशि/योगेश आडे, यांचे पथकाने केलेली आहे.