दुचाकी स्वरांनी महिला वॉर्डनला दिली धडक..पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि ११ डोंबिवली ठाणे
डोबिवली वाहतुक शाखा येथील महिला प्रायवूहेट वाॅर्डन निशा जाधव या दत्त चौक येथे वाहतुक नियमन करीत असताना तेथे एक दुचाकी स्वाराने त्याना मागुन येऊन जोरात धडक दिल्याने त्या खाली पडल्या तरी ही दुचाकी चालकाने त्थाच्या पायावरून दु चाकी चालवली या मुळे निशा जाधव यानी चालकास निट गाडी चालवता येत नाही का असे विचारत त्यास पकडण्यास गेले असता त्या चालकाने निशा जाधव यांच्या हात पकडत जोरात पिरगळत त्याना मारहाण केली. त्या ठिकाणी वाहतुक कर्मचारी यानी येऊन त्या दुचाकी चालकास दु चाकी सह वाहतुक शाखेत कारवाही साठी आणले .

या घटनेत निशा जाधव याच्या उजव्या पाया व हाताला दुखापत झाली असल्या मुळे त्याना तात्काळ शासकीय रूग्णालय शास्त्रीनगर डोबिवली येथे उपचार करण्याण्यास आणले . तेथे त्या बरोबर असलेल्या महिला मदतनीस कानेरकर व वाॅर्डन साळवे यानी वाहतुक शाखातील दिनकर सोमासे याना या बद्दल फोन व्दारे कळविले असता तेथे सोमासे यानी निशा जाधव याना उपचारा करण्या साठी मदत केली . निशा जाधव याना डाव्या पायाला दुखापत झाली असल्याने डाॅक्टरानी उपचार सुरू केले . या घटने मुळे दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम रामनगर पोलिस ठाण्यात सुरू असल्याची माहिती दिली.