भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 13 एप्रिल रोजी जय भिम पदयात्रेचे आयोजन

0
WhatsApp Image 2025-04-11 at 2.47.10 PM
Spread the love

उपसंपादक :मंगेश उईके

पालघर,दि.11:-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दि.14 एप्रिल 2025 रोजी आहे. या जयंतीचे औचित्य साधून मुंबईसह राज्यभर दि.13 एप्रिल,2025 रोजी “जय भिम पदयात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने दि.13 एप्रिल,2025 रोजी सकाळी 7.00 वा. पाचबत्ती येथून “जय भिम पदयात्रा” सुरु होणार असून आंबेडकर चौक येथे समारोप होणार आहे. या पदयात्रेत पालघर जिल्हयातील विविध विद्यालयातील विद्यार्थी,एनसीसी, एनएसएस, एनवायकेएस, भारत स्काउट गाईड माय भारत यामधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तरी या जय भिम पदयात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट