महाडमध्ये वणवा पाहणीसाठी गेलेल्या शिक्षकाचा टेकडीवरून पाय घसरून पडून दुर्दैवी अंत…

0
महाडमध्ये-वणवा-पाहणीसाठी-1
Spread the love

प्रतिनिधी- रेश्मा माने

महाड: महाड शहराजवळील चांभारखिंड येथील रहिवाशी विकास बाबुराव शिगवण यांचा गावाजवळील टेकडीवरून पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दोन दिवसापूर्वी त्यांच्या जागेमध्ये वणवा पसरला होता त्याची पाहणी करण्यासाठी शुक्रवार 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते मुलासोबत टेकडीवर गेले असता तेथे त्यांचा पाय घसरून तोल गेल्यामुळे ते दरीत कोसळले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय महाड येथे आणले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

विकास शिगवण हे रायगड शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. उत्तम शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती.त्यांच्या या अशा अकाली निधनामुळे चांभारखिंड गावावर त्याचप्रमाणे महाड तालुका शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
महाड शहर पोलीस ठाण्यात या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट