शाळेत चोरी करणारे ३ चोरटे स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या जाळ्यात….

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

गोंदिया :

गुन्हा उघड.. गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपुर्ण मुद्येमाल हस्तगत-

  याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, तक्रारदार श्री. भूनेश्वर गेंदलाल बिसेन, राहणार शिवटोला (तांडा) ह. मु. रायपुर, तालुका जिल्हा- गोंदिया (मुख्याध्यापक - लक्ष्मीबाई टेंभरे हायस्कूल, रायपूर.) यांनी तक्रार दिली की, दिनांक 5/4/2025 चे 12.30 वा. ते दि. 7/4/2025 चे 08.00 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी लक्ष्मीबाई टेभरे हायस्कुल, रायपुर येथील शाळेचे कार्यालयाचे साठा रूमचे व वर्गखोलीचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून शाळेचे सुरक्षेकामी लावलेले दहुआ कंपनी 02 बुलेट कॅमेरा, डी. वी. आर तसेच तांदुळ 200 किलो, इंडियन गॅस हंडा जर्मन गंजी 3 नग, 10 लिटर सोयाबिन तेल, 14 किलो वटाणा असा एकुण किंमती 15,100/- रू.चा मुद्देमाल चोरून नेल्याने फिर्यादीचे रिपोर्टवरून पो. स्टे. दवानीवाडा येथे अपराध क्र. 112/2025 कलम 303(2), 331 (4), 305 (इ)  भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून तपासात आहे.

  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास करीत असताना पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे.... शाळेतील साहित्य चोरणारे आरोपी नामे -

1) मनोज तेजु उईके वय 27 वर्ष,

2) आशिक बिरटलाल बागडे वय-26 वर्ष रा. दोन्ही बलमाटोला ता. जि. गोदिया

3) सुरज नामदेव नेवारे वय – 30 वर्ष रा. देवरी ह.मु. रायपुर ता. जि. गोंदिया

     अशा तिघांना गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले... तिन्ही आरोपींना गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस केली असता तिघांनिही  चोरी केल्याचे कबूल केले..तिघांनाही गुन्ह्यात अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल साहित्य किंमती 15,100/- रुपयांचे हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे....आरोपींना पोलीस ठाणे दवानीवाडा  पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया दवानीवाडा पोलीस करीत आहेत..

    सदरची कामगीरी  पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा,  यांचे निर्देश सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, म.पो.उप.नि. वनिता सायकर,अंमलदार रियाज शेख, सोमू तूरकर , संतोष केदार, दुर्गेश पाटील, घनश्याम कुंभलवार यांनी कामगिरी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट