“डिजीटल अटक” गुन्हयातील ८ आरोपींना अटक करुन २२ लाख रुपये गोठविण्यात बोईसर पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे, पालघर यांना यश..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
दिनांक १८/१२/२०२४ ते दिनांक १०/०२/२०२५ रोजीचे दरम्यान फिर्यादी श्री. अनिलकुमार विष्णु आरेकर यांना प्रदिप सावंत नावाचे इसमाने मोबाईल नंबर ८२३७५१६८५८, ७२४९२२०४४५, ९१७२७३६५५१ या नंबर वरुन फिर्यादी यांचे मोबाईल नंबर ७७०९२२४३५९ यावर वेळोवेळी व्हॉटस्अॅप व्हाईस कॉल करुन, तो अंधेरी पोलीस ठाणे, मुंबई येथुन बोलत आहे असे भासवुन, फिर्यादीस त्यांचा मोबाईल नंबर इनलिगल अॅडव्हरटाईजींग व हॅरेशमेंट यामध्ये ट्रेस झाला आहे, तुमची केस सीबीआय कडे गेली आहे, सीबीआय कडुन केसचा तपास होणार आहे, तुमची पोलीस कस्टडी घ्यायची आहे, आम्हाला सहकार्य केले नाही, तर दहा मिनीटात पोलीस तुमच्या घरी येतील, याची गुप्तता ठेवली नाही तर ०५ वर्ष जादा शिक्षा भोगावी लागेल असे सांगुन, प्रमोद शंकर भोसले, सीबीआय पब्लिक प्रोसिक्युटर नावाचे इसमास कॉन्फरन्सवर घेवुन, फिर्यादीस तुम्ही जेष्ठ नागरीक आहेत. तुम्हाला यातुन बाहेर पडायचे असेल तर, आमचे ऐकावे लागेल, हे सिक्रेट मिशन आहे. तुम्ही आमचे ऐकले नाही तर तुमच्या मुलीला त्रास होईल असे सांगुन, तुमचे अकाऊंट मधील सर्व रक्कम रिझर्व्ह बँक व सीबीआय चौकशी करुन दि. १०/०३/२०२५ पर्यंत सर्व रक्कम परत करण्यात येईल असे आश्वासित करुन, फिर्यादीस डिजीटल अरेस्ट करुन, वेगवेगळया बँकांचे अकाऊंट नंबर पाठवुन, फिर्यादीस एकुण ३,५६,६०,०००/-रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडुन, फिर्यादीचे रक्कमेचा अपहार करुन फसवणुक केली म्हणुन बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.१४९/२०२५ भारतीय न्याय संहिता-२०२३ कलम ३१९(२), २०४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० चे कलम ६६ (सी, ६६ (डी), प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी सायबर पोलीस ठाणे व बोईसर पोलीस ठाणे यांचे पथक तयार करून तपास करण्याबाबत सुचना दिल्या. सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण करून व सखोल तपास करून आत्तापर्यंत खालील आरोपीत क्रमांक ०१ ते ०४ यांना नागपुर व आरोपीत ०५ ते ०७ यांना अंकलेश्वर राज्य गुजरात येथुन व आरोपी क्र. ०८ यास बंतारा जि. औरंगाबाद राज्य बिहार येथून अटक करण्यात आलेली आहे.
१. मो. सैफ रिजवान अहमद अन्सारी वय २६ वर्ष रा. रजा टाऊन, रिजवान मंजील, दोन हात नाका नं. ०२, कामठी रोड, पोलीस ठाणे कपिलनगर, नागपुर
२. मो. फैज रिजवान अहमद अन्सारी वय २५ वर्ष रा. रजा टाऊन, रिजवान मंजील, दोन हात नाका नं. ०२, कामठी रोड, पोलीस ठाणे कपिलनगर, नागपुर
३. मो. झोएब रिजवान अहमद अन्सारी वय २० वर्ष रा. रजा टाऊन, रिजवान मंजील, दोन हात नाका नं. ०२, कामठी रोड, पोलीस ठाणे कपिलनगर, नागपुर
४. गुणवंत रामराव मते वय ३३ वर्ष रा आबिदअली यांचे घर, उदय शाळेजवळ, भांडेवाडी, पारडी, नागपुर
५. इाकरीया असरार झोया वय २५ वर्ष, रा. झकरीया पार्क, कापोदरा, ता. अंकलेश्वर, जि. भरुच, राज्य गुजरात, मोबा. नं. ७०४३०७७८३५
६. शोएब मोहम्मद हनिफ शहा वय २९ वर्ष रा.एस.एफ.९, विरामन, पाकीझा पार्क, अंकलेश्वर, ता. अंकलेश्वर, जि. भरुच, राज्य गुजरात मोबा. नं. ८४८८९४४९९१
७. रिझवान साबीर हुसैन मलिक वय ३४ वर्ष रा. सी. ०८, सपना सोसायटी, आंबोली रोड, ईदगाह जवळ, अंकलेश्वर, ता. अंकलेश्वर, जि. भरुच, राज्य गुजरात.
८. बाबर मो. सिराज खान वय ३० वर्षे रा. बंतारा ता. गोह, जि. औरंगाबाद राज्य बिहार यांना नमूद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये गुन्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय लिंक असल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने सर्व शक्यता पडताळणी नेमले पथक तपास करत आहे. आरोपी क्र. १ ते ७ यांना मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पालघर यांनी दि.११/०४/२०२५ रोजी पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे व आरोपी क्र. ८ यांना आज रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शिरीष पवार, पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस ठाणे, श्री. अजय गोरड, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक श्रीमती, रुपाली गुंड, श्री. चंद्रकांत हाके, श्री. विठठल मनिकेरी, पोहवा/दुबळा, पोहवा/रमेश पालवे, पोहवा/शरद सानप, पोहवा/राहुल पाटील, पोअं/मयुर पाटील नेम बोईसर पोलीस ठाणे, पोअंम. / रामदास दुर्गेष्ट, पोअं/रुपेश पाटील, पोअं/जिग्नेश तांबेकर नेम- सायबर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास श्री. शिरीष पवार, पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस ठाणे हे करत आहेत.