मैत्रीणीस कॉफीमधुन गुंगीचे औषध देवुन बेशुध्द करुन तिचे घरातील दागिने चोरणा-या महीला आरोपीस अटक ..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
तिच्याकडुन ५,४६,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने केले जप्त
दिनांक ०६/०३/२०२५ रोजी फिर्यादी महीला घरी असताना त्यांचे ओळखीची मैत्रिण ऐश्वर्या संजय गरड, वय २५ वर्षे, रा. सिंहगड कॉलेज जवळ एमराईड सोसायटी, आंबेगाव पठार, पुणे हिने फिर्यादीस तिचे कडील कॉफी या द्रवपदार्थातून कोणतेतरी गुंगीकारक औषध टाकुन फिर्यादीला कॉफी पाजून फिर्यादी बेशुध्द होवुन झोपी गेल्यानंतर तिच्या बेडरुम मधील कपाटाचे ड्रॉव्हर मधील ५,४६,०००/-रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी करुन घेवुन गेली असुन आरोपीने फिर्यादीकडे सोन्याचे दागीने चोरी केल्याचे कबुल करुन ती परत करते असे बोलुन सुध्दा आरोपीने परत केले नाही म्हणून फिर्यादी यांनी दिले तक्रारी वरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर १९४/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५,१२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे नमुद महीला आरोपी ऐश्वर्या गरड हिचा शोध घेणेबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री सावळाराम साळगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नमुद महीला आरोपी हिचा शोध घेत असताना ती महीला आरोपी ही पुणे स्टेशन येथे मिळून आल्याने तिला दिनांक ०३/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे तपास करुन तिच्याकडुन फिर्यादी यांचे चोरी केले ५,४६,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर (अतिरिक्त कारभार) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.२ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, प्रियांका निकम व पोलीस अंमलदार किरण देशमुख, राहुल शेडगे, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार व महीला पोलीस अंमलदार सोनाली गावडे, चंदन रसाळ, प्रज्ञा निंबाळकर यांच्या पथकाने केली आहे.