कम्युनीटी पोलीसींग कार्याक्रमाअंतर्गत खराडी पोलीसांनी रक्तदान शिबीराचे केले आयोजन..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
खराडी पोलीस स्टेशन पुणे येथे कम्युनीटी पोलीसींग कार्यक्रमा अंतर्गत दिनांक ०५/०४/२०२५ रोजी सकाळी १०/०० तेदुपारी ०२/०० वाजेपर्यंत मदरहुड हॉस्पीटल व हिंजवडी ब्लडबँक यांचे संयुक्त विद्यमानाने व सहकार्यातुन रक्तदान शिबीराचे आयोजन करणेत आले. आयोजीत रक्तदान शिबीरामध्ये खराडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे बरोबरच पोलीस स्टेशनचे हद्दीतील नागरीकांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवुन, ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. पोलीसांनी आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरामुळे नागरीकांनी पोलीसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे.


तसेच मदरहुड हॉस्पीटल व हिंजवडी ब्लडबँकचे डॉक्टर व स्टाफ यांनी, उन्हाळ्यात रक्तपेढ्यांना रक्ताचा तुटवडा जाणवत असतो व अशा वेळी खराडी पोलीसांनी रक्तदारशिबीर आयोजीत करून, चांगला उपक्रम राबवुन सामाजीक कार्यामध्ये हातभार लावलेबद्दल खराडी पोलीसांचे आभार मानून कृतघ्नता व्यक्त केली आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४, पुणे शहर श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सिध्दनाथ खांडेकर, पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडला आहे.