२ गुन्हयात पाहीजे बलात्कारी, रिल स्टार आरोपीस यास खंडणी विरोधी पथक, ठाणे यांच्याकडून नाशिक येथुन अटक..

सह संपादक – रणजित मस्के
ठाणे
१) मानपाडा पोलीस स्टेशन गुरन ३४१/२०२५ वीएनएस कायदा कलम ६४, ७४, ११५(२), ३५१(२), ३(५) सह आर्म अॅक्ट कायदा कलम ३. २५ व २) टिळकनगर पोलीस स्टेशन गुरन २६७/२०२५ भादवि कलम ३७६ (२), (एन) ५०४, ५०६ प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे सुरेद्र पांडुरंग पाटील, ५२ वर्षे, रा. चौधरी बिल्डीग, २ रा माळा, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, बारा बंगला रोड, ठाकुर्ली, डोबिवली पुर्व हा गुन्हे दाखल झाले पासुन फरारी झालेला होता व मिळुन येत नव्हता. सदर पाहीजे आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा गुप्त बातमीदाराकरवी शोध घेतला असता तो हॉटेल सेलीब्रेशन जिल्हा नाशिक याठिकाणी लपुन बसला असल्याबाबत माहीती प्राप्त झाली होती.


सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने आरोपी सुरेद्र पांडुरंग पाटील यास इंदीरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांचे मदतीने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी हॉटेल सेलीब्रेशन जिल्हा नाशिक येथुन दिनांक ०४/०४/२०२५ रोजी २०.०० वाजता ताब्यात घेतले असुन, त्यास पुढील तपासकामी मानपाडा पोलीस स्टेशन याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १. गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२. गुन्हे शाखा, ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/नरेश पवार, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/४०४४ ठाकुर, पोहवा/१०१५ पाटील, पोहवा /१५१० गायकवाड, पोहवा / २७० जाधव, पोहवा/१४१६ गडगे, मपोहवा/४४६६ पावसकर, पोना/१९२५ हासे, पोना/७०७९ मधाळे, चापोना/७३१२ हिवरे, पोशि/३२१३ वायकर, पोशि/८२४६ ढाकणे यानी केली आहे.