नागपूर येथील सक्करदरा पोलीसानी हद्दीत चोरी केलेला माल हस्तगत करून २ अल्पवयीन मुलाचा घेतला ताबा…
प्रतिनिधी-महेश वैद्य
नागपूर: फिर्यादी समीर सुधाकर शातलवार रहाणार पलाॅट नं.27 , सोलंकी वाडी ,सोनझारी नगर जवळ,बिडीपेठ रोड पो.स्टे. सक्करदरा नागपूर शहर यानी दिनांक 15 /11/22 रोजी पोलीस ठाणे सक्करदरा याना दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 11 /11/2022 ते 14/11/2022 रोजी त्यांच्या रहात्या घरी फिर्यादी उज्जैन येथे गेले असता तिथून परत आले असता त्याना मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घराचे आत प्रवेश करुन 1) रोख 15000/- रु.आणि 2) 3 ग्रॅम सोन्याची रींग किमत अंदाजे 9000/- रुपये असा एकूण रु.24000/- माल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली.

सदर गुन्ह्याचे तपासात गुप्त बातमीदार नेमून आरोपीचे नाव व घराचा पत्ता निष्पन्न करून त्याचे रहात्या घरातून ताब्यात घेण्यात आले त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता विकास ऊर्फ विकू शंकर शर्मा वय 16 वर्षे रहाणार इंदिरानगर ,जाटरतोडी गल्ली नं.3 पो.स्टे. इमामवाडा नागपूर असे सांगितले त्यास गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्यास गुन्हयासंबंधाने विचारपूस केली असता त्याने नमुद गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल हा त्याचे साथीदार नामे देव दिलीप जाधव वय 16 वर्षे रहाणार बेसा पावर हाऊस मागे , म्हाळगी नगर पोलीस.स्टे.हुडकेश्वर नागपूर याच्या सोबत केल्याचे सांगितले व गुन्हयातील चोरी केलेले पैसे हे आम्ही दोघांनी खाण्यापिण्यावर खर्च केले व सोन्याची रींग ही माझ्या घरी ठेवल्याचे सांगितले त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरून पिवळ्या धातुची कानातील जोड मिळुन आले.तसेच त्याच्या घराच्या पार्किंग मध्ये पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा गाडी मिळुन आली असता गाडीबाबत विचारले असता त्याने सदरची गाडी ही त्याचा साथीदार देव दिलीप जाधव याच्या सोबत ऑरीयस हाॅसपिटल पो.ठा.अजनी हद्दीतून चोरी केल्याचे सांगितले .
तसेच नमुद विधी संघर्ष ग्रस्त बालक यास अधिक विचारपुस केली असता त्याने पो.स्टे. अजनी येथील चोरी केलेल्या गाडीची नंबर प्लेट काढून घेऊन गुन्हा करायचे वेळेस गाडीचा वापर करीत होते.नमुद आरोपी यानी अशा प्रकारे अनेक गुन्हे केले आहेत.
त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हा दाखल होताच अवघ्या 2 दिवसात तपास पथकाने अथक परिश्रम करून उघडकीस आणला आहे .
सदरचा तपास मा.पो.आ.श्री अमितेशकुमार सा.,मा.अ. पो.आ.दक्षिण प्रभाग नागपूर श्री. नवीनचंद्र रेडडी , मा. पो. उपा.परी.4 नागपूर शहर श्री. गोरख भामरे , मा.स.पो.आयुक्त सक्करदरा विभाग श्री. गणेश बिरादार यांचे मार्गदर्शनाखाली श्री. धनंजय पाटील व.पो.नि.पोस्टे सक्करदरा नागपूर, श्री रुषिकेश घाडगे पो.नि.गुन्हे पो.ठा.सक्करदरा नागपूर ,सचिन सावरकर पो.उपनिरीक्षक पो.स्टे. सक्करदरा, पो.ह.जयेश झाडे,निलेश पोराटे, पो.अं.मनोज ढोले,ओमप्रकाश मते,प्रितेश देशपांडे,पोलीस शिपाई कपील राऊत,अमोल भालेराव सर्व नेमणूक पो.स्टे. सक्करदरा नागपूर यानी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com