अवधुतवाडी पोलीसानी जबरी चोरी करणारे गुन्हेगारांना केली २४ तासात अटक..

यवतमाळ :
सह संपादक – रणजित मस्के
मा पोलीस अधिक्षक कुमार चिंता सो यांनी जबरी चोरी करणारे आरोपी यांचा शोध घेवुन शहरातील होणान्या जबरी चोच्या रोखण्यासंदर्भात आदेश दिले होते. अवधुतवाडी पोलीस स्टेशन अप क ५४९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हयात फिर्यादी यास आठवडी बाजार परीसरात फिर्यादी हे जास्त प्रमाणात दारूचे सेवन करून असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने धाक दाखवुन यातील आरोपींनी मोबाईल व गाडी काढून घेवन जबरी चोरी केली होती. मा पोलीस निरीक्षक श्री नरेश रणधीर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणन्याकरीता गुन्हें प्रकटीकरण पथकास सर्तक करून आठवडी बाजारा कडे जाणारे येणारे रोड वर असणारे सर्व सिसिटिकी चेक करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाने बारकाईने सर्व सिसिटिव्ही फुटेज चेक केले असता आठवडी बाजारात असणारे काही सिसिटिव्ही फुटेज मध्ये संशयास्पद हालचाली दिसुन आल्या त्यामध्ये आरोपी हे चेहन्यावर शेले गुंडाळून असताना देखील तांत्रीक बाबींचा सखोल तपास करून फिर्यादी व आरोर्पाच्या मार्गाचा मागोवा घेतला असता दोन संशयीत इसम दिसुन आले. त्यांचा गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदारा मार्फत शोध घेवुन त्यांना शिताफीने पकडण्यात अवधुतवाडी गुन्हे प्रकटीकरण पश्चकास यश मिळाले आहे. पकडण्यात आलेले आरोपी यांची नावे ०१) किरण उर्फ मायकल अजाबराव गेडाम वय २६ वर्षे रा पिपरी गुष्टी यवतमाळ ०२) वर्धन दुर्गेश शुक्ला वय २८ वर्षे रा चापडोह यवतमाळ अशी त्यांची नावे असुन आरोपींना वरील गुन्हयात अटक केल्यानंतर कौशल्यपुर्ण तपास करून आरोपींकडून गुन्हयात जबरी गोरी केलेली एक मोटार सायकल क एम एच २९ वी वाय ९३७७ होंडा शाईन व एक रेडमी कंपनीचा मोबाईल असा ७६,५०० रू था मुददेमाल वरील आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे
सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक श्री कुमार चिंता सो तसेच मा अपर पोलीस अधिक्षक श्री पियुष जगताप सो, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश बैसाने सो पोलीस निरीक्षक श्री नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा पोलीस निरीक्षक श्री रोहित चौधरी, पोउपनि सुरज जगताप, सफौ १६९१ गजानन वाटमोडे, सफौ ६११ मेश्राम, पोहवा ११ विशाल भगत, पोहवा १५९९ बलराम शुक्ला, पोहवा ७५१ मुंडे, पोना १३९२ रूपेश ढोबळे, पोशी १४२१ प्रशांत पाटील, पोशी १० योगेश नोपडे यांनी बजावली.