ना. भरतशेठ गोगावले यांनी घेतली केंद्रिय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
महाड:- राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभ्ाूमी विकास मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी आज (गुरुवारी) दिल्ली येथे केंद्रिय ग्रामविकास मंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. विकसित भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर ‘मनरेगा’च्या माध्यमातून दारिद्रय रेषेखालील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, शिवराजसिंह चौहान देत असलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच, या विभागार्मुत महाराष्ट्राला पुरेसा निधी मिळावा, अशी मागणी करणारे निवेदनही ना. गोगावले यांनी त्यांना दिले.


ना. शिवराजसिंह चौहान यांना दिलेल्या निवेदनात, ना. गोगावले यांनी राज्यासाठी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, केंद्र शासनाने सन २०१४-१५ पासून देय असलेला ७५ टक्के साहित्य निधी, महाराष्ट्राला तातडीने देण्यात यावा, प्रशासकीय खर्चासाठी केंद्राकडून देय असलेला ५७.७८ कोटी रुपयांचा निधी मिळावा, वेतन घटक म्हण्ाून केंद्राकडून येणे असलेला १ हजार २२८ कोटींचा निधी राज्याला मिळावा, या तीन मनरेगाशी संबंधित मागण्या ना. गोगावले यांनी केल्या आहेत.
याखेरीज महाराष्ट्रात पंचवीस लाख कुटुंबे दारिद्रय रेषेखालील आहेत. तर तामिळनाडूमध्ये ४.६३ लाख कुटुंबे दारिद्रय रेषोखाली आहेत.असे असतानाही, तामिळनाडूसाठी बत्तीस कोटी मनुष्य निवासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रासाठी केवळ१० कोटी मनुष्य निवासासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यात वाढ करण्यात यावी, त्याचप्रमाणे व्यक्तिगत मर्यादा पाच लाखांवरुन दहा लाख रुपये करण्याची मागणीही त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.मनरेगाच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंब लखपती करुन, राज्यातील प्रत्येक गाव मनरेगा मुक्त करण्याचा संकल्प आपण सोडला असल्याचा विश्वासही ना. गोगावले यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केंद्रिय ग्रामविकास मंत्र्यांना दिला आहे.दिल्लीतील संसद भवनात झालेल्या या भेटीच्या वेळेस केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, खा. श्रीरंग बारणे, खा. श्रीकांत शिंदे आणि खा. संदीपान भ्ाुमरे हे देखील ना. गोगावले यांच्यासमवेत उपस्थित होते.केंद्रिय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमवेत झालेली भेट व चर्चा सकारात्मक होती, असे ना. गोागवले यांनी या भेटीनंतर बोलताना सांगितले.