शेतकऱ्याचे अपहरण करुन त्यास २५ लाख रुपये खंडणी मागणारे ६ ५ दरोडेखोरांना मौजपुरी पोलीसांनी केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

जालना ;

सविस्तर हकीकतः-

पोलीस ठाणे मौजपुरी जि. जालना येथील शेतकरी फियांदी निवृत्ती तांगडे रा. धानोरा ता.जि. जालना यांनी तक्रार दिली कि, दिनांक 22/03/2025 रोजी रात्री 01.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी मौजे धानोरा येथील त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर झोपलेले असतांना 05 ते 07 अज्ञात चोटयांनी त्यांचे तोंड दाबुन त्यांना त्यांच्या गाडीमध्ये टाकून जालना मंठा हायवे रोडने जालनाच्या दिशेने घेऊन गेले व त्यांच्या खिशातील 15,000/- हजार रोख रक्कम काढून घेऊन त्यांना जिवे न मारता सोडून देण्यासाठी 25 लाख रुपयाची खंडणी मागीतली. फिर्यादी हे घाबरलेले असल्याने दरोडेखोरांना खंडणी म्हणुन 25 लाख रु. देण्याचे मान्य केल्याने त्यांना मौजे घोडेगाव फाटा ता.जि. जालना येथे रात्रौ आणून सोडुन दिले. त्यानंतर दिनांक 22/03/2025 रोजी दुपारी 04.00 वाजे सुमारास दरोडेखोरांनी फिर्यादी यांना त्यांच्या फोनवर संपर्क करुन त्यांना धमकावून खंडणी म्हणुन 25 लाख रु. दे अन्यथा तुझ् यासह तुझ्या कुटुंबालाही संपवून टाकू अशी धमकी दिल्याने फियांदी यांनी पोलीस ठाणे मौजपुरी येथे हजर येऊन दिलेल्या फिर्यादी प्रमाणे पोलीस ठाणे मौजपुरी जि. जालना येथे कलम 309(04),140(2),351(2) (3),3(5) 310(2) भा.न्या. सं प्रमाणे गुन्हा दाखल झ शालेला आहे.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हा उघड करुन आरोपी निष्पन्न करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक साहेब, जालना यांनी व इतर वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा उघडकिस करुन आरोपी अटक करणेबाबत सूचना दिल्या त्यानुसार वरीष्ठांनी दिलेल्या सुचना प्रमाणे सदर गुन्हयायावत फिर्यादी यांचेकडुन गुन्हयायावत सविस्तर हकीकत समजावुन घेऊन डुकरी पिंपरी टोलनाका येथील सी.सी.टि.व्ही फुटेज चेक करुन फिर्यादी यांनी सांगीतलेल्या वाहनाचे वर्णनाप्रमाणे एक स्कार्पिओ वाहन विना क्रमांकाचे दिसले सदर वाहनाचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढून तसेच तांत्रिक विश्लेषणातुन सदर गुन्हयात आरोपी नामे 1) गणेश तात्याराव श्रीखंडे 2) रामप्रसाद ऊर्फ बाळू डिगांबर शिंदे दोघे रा. सावरगाव (हडप) ता.जि.जालना 3) आकाश अशोक घुले रा. मुकर्कीदपुर, नेवासा फाटा जि. अहिल्यानगर 4) विशाल ऊर्फ गजानन डोंगरे रा. सावरगाव (हडप) ता.जि.जालना 5) आकाश तुकाराम रंधवे रा.हडप ता.जि. जालना यांना नमुद गुन्हयात अटक करुन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना गुन्हयायावत विचारपुस त्यांनी आरोपी नामे अनिकेत गोरख उकांडे रा. अकोलनेर जि अहिल्यानगर व शाम चव्हाण रा.साळेगाव तांडा ह.मु. सरस्वती मंदिराच्या पाठीमागे खरपुडी, जालना (फरार आरोपी) यांच्या मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीतांच्या ताब्यातुन गुन्हया वापरलेले एक स्कार्पिओ वाहन क्र- MH-23-AS-7272 व आरोपीतांचे मोबाईल असे एकुण (9,80,000/-) रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपीतांना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीतांचा 04 दिवस पी. सी. आर मंजुर केला असुन गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.

सदर चा गुन्हा हा श्री अजयकुमार बंन्सल साहेब, पोलीस अधीक्षक, जालना, श्री आयुष नोपाणी साहेब, अपर पोलीस अधीक्षक, जालना, श्री. दादाहरी चौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग परतुर तसेच श्री. पंकज जाधव साहेब, पो.नि. स्थागुशा, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगीरी ही श्री. मिथुन घुगे, सहा. पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो.स्टे मौजपुरी, पोउपनि श्री. विजय तडवी, ग्रे. पोउपनि श्री. जाधव सफी/चंद्रकांत पवार, ज्ञानोबा बिरादार, मच्छिद्र वाघ, दिलीप गोडबोले, नितीन खरात, राजेंद्र देशमुख, भास्कर वाघ, सतिष गोफणे, नितीन कोकणे, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, धोंडीराम वाघमारे, प्रशांत महस्के, सदाशिव खैरे, कैलास शिवणकर, तसेच स्थागुशा चे तांत्रिक विश्लेषण करणारे सागर बावीस्कर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट