पोलीस ठाणे सदर बाजार डिबी पथकाकडून प्रतिबंधीत गुटखा व वाहन असा एकुण 9,50,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त

सह संपादक – रणजित मस्के
जालना :
दिनांक 27/03/2025 रोजी पोलीस ठाणे सदर बाजार डिबी पथकाचे प्रमुख पोउपनि शैलेश म्हस्के यांना गोपनिय बातमीदारा मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, संभाजीनगर परीसरामध्ये महिंद्रा कंपनीची जीतो प्लस लोडींग गाडी उभी आहे. अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती प्रभारी अधिकारी संदीप भारती यांना देऊन त्यांचे आदेशाने तसेच मार्गदर्शनाखाली, दोन पंच व पोलीस स्टाफ सह संभाजीनगर परीसर जालना येथे जाऊन सदर गाडीचा शोध घेतला असता तेथे एक गाडी MH-20-BH-7400 महिंद्रा कंपनीची जितो प्लस लोडींग गाडी मिळुन आली आसता आम्ही आजुबाजुला गाडीच्या मालकाबाबत विचारपुस केली गाडो मालक अजय वाघमारे रा ढवळेश्वर जालना यांचे नावावर असल्याचे आढळुन आले त्यांचे मोबाईलवर फोन केला असता तो मोबाईल बंद असल्याचे आढळून आले सदर गाडी पोस्टेला आणुन अन्न व औषध प्रशासन यांना लेखी पत्रक दिले. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग यांनो आज दिनांक 28/03/2025 रोजी 14.30 वाजता दोन पंचासमक्ष सदरील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 2,00,000/- रुपये किमतीचा ज्यामध्ये 20 गोण्या प्रत्येक गोणीत Export Quality No 1 असे लेबल असलेले 50 पाकीट याप्रमाणे एकुन 1000 पाकीट त्यामध्ये सुपारी कथा, चुना व तंबाखु मिश्रीत गुटखा व 7,50,000/- रुपये किमतीची महिंद्रा जितो प्लस लोडीग गाडी वाहन क्रमांक MH-20-BH-7400 असलेली असा एकुन 9.50,000/- रुपयाचा मुददेमाल मिळुन आलेले आहे. 1. अजय वाघमारे रा. ढवळेश्वर, जालना 2. सचिन तारगे रा. संभाजीनगर, जालना यांचेवर कलम 123,223,275,3(5) भारतीय न्यास संहिता 2023 सह कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयूष नोपाणी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे साहेब अतिरीक्त पदभार, पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती साहेब यांचे मार्गदर्शनाखालो पोउपनि शैलेश म्हस्के यांचे नेतृत्वात डी.बो. पथकाचे पोहेकॉ/593 रामप्रसादर रंगे, पोहेकॉ/1070 धनाजी कावळे, पोकॉ/1698 धनंजय लोढे यांनी केली आहे.