रमजान सणाचे अनुशंगाने गावठी हातभट्टी तयार दारुचा मोठा साठा वानवडी पोलीस स्टेशनने केला हस्तगत..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

पुणे सहरातील अवैध धंदयावर कारवायां करुन त्यांचे समूळ उच्चाटन करून नियंत्रण ठेवण्यासाठी मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी आदेश दिल्याने व दिनांक ३१/०३/२०२५ रोजी रमजान सणाचे अनुशंगाने पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखून बेकायदेशीर कृत्यास तत्काळ प्रतिबंध करुन, त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे अनुशंगाने वानवडी पोलीस ठाणे अंकीत सुरक्षानगर पोलीस चौकीचे कार्यक्षेत्रात आमचेकडील उपलब्य खाजगी वेगवेगळ्या दुचाकी वाहनांवरुन पेट्रोलिंग करीत गोसावी वस्ती, हडपसर, पुणे येथे आलो असता सुमारे ११/४५ वा. चे सुमारास महीला पोलीस हवा ६१९८ ताकवले यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गोसायी वस्ती, हडपसर, पुणे येथे एक इमस आपले कब्जात तयार हातभट्टीचा दारु विक्री करीत आहे. अशी बातमी मिळाली असता. सदरबाबत वरिष्ठांना कळवुन, वरिष्ठांचे आदेशाने चौकीच्या स्टाफसह छापा कारवाईसाठी लागणाऱ्या साहीत्यासह वरिष्ठानी दिलेल्या सूचनांप्रमाणे आंम्ही पोलीस स्टाफ व पंच असे सदर ठिकाणी जावून अचानकपणे सकाळी ११/४५ या छापा टाकून सदर दारु विक्री करणाऱ्या इसमास आहे त्या परिस्थीतीत पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यांने आपले नाव सोमनाथ संजय कांबळे वय ३० वर्षे धंदा मजुरी रा. बिराजदारनगर गल्ली नं. २ जुना म्हाडाजवळ, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याचेहातात असलेली नायलॉनच्या पोत्याची पाहाणी करता त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारु मिळून आली त्याबाचत त्यास विचारणा करता सदर दारु विक्री करण्याकरीता आणली आहे असे सांगीतले. तसेच सोबत असलेल्या स्टाफने सदर पत्र्याचे शेडच्या मागील बाजुस जावुन पाहाणी केली असता बेडसिउखाली लपवून ठेवलेले ३५ लिटर मापाची तयार हातभट्टी वारु भरलेली हत्ती कॅन एकूण १२ नग, सदर दारु विक्री करणाऱ्या इसमाकडे रोख रक्कम ३५००/- रु असा एकुण १५,३५०/- रुपये मुद्देमाल मिळुन आल्याने सदर इसमाचे विरुध्द वानवडी पोलीस स्टेशन महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

सदरची कारवाई ही, मा.श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त सो, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री सत्यजित आदमने वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सुरक्षानगर पोलीस चौकी प्रभारी अविनाश शिंदे पोलीस उप निरीक्षक व सहा पोलीस उप निरीक्षक किशोर राणे म.पो. हवा ६१९८ रुपाली ताकवले, म.पो.अंम. ४२५९ मंगल पारधी, पो.मि. ९२ सोनपसारे, पो. अंम. ७४०८महेश माने यांनी केली आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक अविनाश शिंदे हे स्वतः करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट