मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना यश..

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर :
दि.२१/०३/२०२५ रोजी बोईसर पोलीस ठाणे हद्दितील मान येथील फिर्यादी अंकुश मधुकर टोकरे वय ४० वर्षे, रा. बारीपाडा, पो. गुंदले, ता. जि. पालघर यांची होंडा अॅक्टीवा स्कुटी क्रमांक एम.एच.-४८-सी.जी. ९११४ ही मान ग्रामपंचायत कार्यालया समोर रोडचे कडेला उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती फिर्यादी यांचे संमतीशिवाय, लबाडीचे इरादयाने, स्वतःचे फायदयाकरीता, उघडयावरून चोरी करून चोरून नेली आहे म्हणुन फिर्यादी यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरुध्द बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १४६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशाने पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पोउपनि/रोहित खोत, पोहवा/विजय ठाकुर, पोना/कल्याण केंगार, पोअं/वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे पथक तयार करून तपास करण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने सदर पथकाने गोपणीय तसेच तांत्रीक माहितीच्या आधारे संशयीत आरोपी १) तेजस काशिराम दाधव, वय १८ वर्षे, रा. धोडीपुजा, बोईसर २) साहिल चंद्रीकाराम कुमार वय २० वर्षे, सध्या रा. ड्रिमसिटी, बोईसर, मुळ रा. ग्राम कानोला, करनहट, पोस्ट कानौला चंदेसर जि. आड़ामगड, राज्य उत्तरप्रदेश यांस ताब्यात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपीस अटक केले असून वर नमुद चोरीस गेलेली स्कुटी ही आरोपींकडून जप्त करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोउपनि/शेख, नेमणुक बोईसर पोलीस ठाणे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोनि/शिरीष पवार, प्रभारी अधिकारी, बोईसर पोलीस ठाणे, पोउपनि/रोहित खोत, पोहवा/विजय ठाकुर, पोहवा/संजय धांगडा, पोना/कल्याण केंगार, पोअं/वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.