IPL क्रिकेट सामन्यांवर मोबाईलव्दारे ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या ७ इसमांवर स्था. गुन्हे शाखा जालना यांची कारवाई..

सह संपादक – रणजित मस्के
जालना
नविन मोंढा जालनाकडे जाणाऱ्या बायपास रोडलगत असलेल्या हॉटेल कनक पॅलेसच्या पाठीमागील मोकळया आवारात काही इसम सध्या चालु असलेल्या IPL. क्रिकेट सामन्यांवर मोबाईलव्दारे ऑनलाईन सट्टा घेत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्यांचेवर कारवाई करणे बाबत मा.पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी सुचना दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने दिनांक 31/03/2025 रोजी नविन मोंढा जालनाकडे जाणाऱ्या बायपास रोडलगत असलेल्या हॉटेल कनक पॅलेसच्या पाठीमागील मोकळया आवारात छापा मारला असता सदर ठिकाणी इसम नामे 1) गोपीसींग प्रल्हादसीग टाक वय 25 वर्षे, रा. गुरुगोविंदसीग नगर, जालना, 2) अजितसोंग मलखानींग कलाणी वय 34 वर्षे, रा. लहुजी नगर, चंदनझिरा जालना, 3) विजय कैलास खरे वय 30 वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गल्ली, कन्हैयानगर जालना व 4) अमित नंदलाल दागडीया वय 34 वर्षे, रा. खरपुडी रोड, हरीगोविंद नगर जालना हे व्हॉटसअॅप व फोन कॉलवरुन आय.पी.एल (IPL) क्रिकेट सुरु असलेली मॅच के. के. आर (कोलकत्ता नाईट रायडर्स) विरुध्द एम.आय (मुंबई इंडियन्स) 20/20 क्रिकेट मॅचवर हारजीतचा सट्टा जुगार खेळ खेळतांना व खेळवितांना मिळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात व कब्जात 53,510/- रु. किंमतीचा मुद्देमाल ज्यात मोबाईल व रोख रक्कम मिळुन आला सदरचा सट्टा हा फरार असलेले बुकी नामे 5) लोकेश भगत रा.जालना, 6) हर्षल भगत रा. जालना व 7) शेख गणी अजिम ऊर्फ जिगरी रा. देऊळगावराजा जि. बुलडाणा यांना फोनव्दारे व व्हॉटसअपव्दारे देत होते यावरुन आरोपीतांकडे केलेल्या चौकशीमध्ये दिसुन आले त्यावरुन पोलीस स्टेशन चंदनझिरा जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि श्री. योगेश उबाळे, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, सागर बाविस्कर, सोपान क्षिरसागर व धिरज भोसले सर्व स्थागुशा जालना यांनी केली आहे.