घरफोडी करणाऱ्या २ आरोपींकडून मुंब्रा पोलीसानी ७ तोळे सोन्याचे व २२ तोळेचे दागिने केले हस्तगत..

सह संपादक- रणजित मस्के
मुंब्रा :
घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना आठवडयाभरात ताब्यात घेवून गुन्हयाची उकल करून गुन्हयातील गेला माल ७ तोळे सोन्याचे दागिने व २२ तोळे चांदीचे दागिने असा एकुण २,१८,०००/- रुपये अंदाजे जु, वा. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत”



दिनांक २०/०३/२०२५ रोजी सायंकाळी ०४.०० वा. ते ६.४५ वा. दरम्यान फिर्यादी हया त्यांचे घराचे दरवाजा बंद करून उपवासाचा पवित्र रमजान महिना चालू असल्याने कपडे खरेदी करणेकरीता मुलाला घेवून मार्केटमध्ये मुंब्रा अमृतनगर गेले असता, घराचे दरवाजाचे कुलूप यातील अटक अरोपीत यांनी डुब्लीकेट चावीने दरवाजा उघडून त्यावाटे घरात प्रवेश करुन किचनमधील लोखंडी कपाटाचे दरवाजा व लोकर कशाचेतरी सहायाने तोडून कपाटमधील ०७ तोळे सोन्याचे दागिने व २२ तोळे चांदीचे दागिने असा एकुण रु २,१८,०००/- घरफोडी करुन नेल्याने मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नोंद क्र. ४९४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, अंमलदार यांनी गोपनिय बातमीदार यांचेमार्फतीने तपास करत असतांना आरोपी नामे १) सुफियान शब्बीर शेख वय २२ वर्षे, व्यवसाय-मजुरी, राह. इब्राहिम हाईट्स रूम नंबर ५०२ खर्डीरोड, मन्नत हॉल जवळ मुंब्रा ता. जि. ठाणे २) मेहराज साबितअली शेख वय २२ वर्षे, व्यवसाय-मजुरी राह. अयशा अर्पामेंट रूम नंबर ४०२, बैतुल रहमान मजिद जवळ, देवरीपाडा श्रीलंका मुंब्रा ता. जि. ठाणे यांना काहीएक सुगावा नसतांना संशयीत म्हणून ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाचे तपासावे अनुषांगाने सखोल तपास केला असता, त्यांनी नमुद गुन्हा आपसात संगणमत करून पाहिजे आरोपी फजल असे तिघांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिल्याने वरील दोन आरोपीतांना दिनांक २८/०३/२०२५ रोजी ०२:५० वाजा अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीतांची दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे.
अटक आरोपीतांकडे कौशल्यपुर्ण तपास करून, तपासाधीन गुन्हयातील घरफोडी चोरी केलेला ०७ तोळे सोन्याचे व २२ तोळे चांदीचे दागिने असा एकुण रुपये २,१८,०००/-अंदाजे जु. वा. किंमतीचा मुद्देमाल भा. सा. पु २३(२) प्रमाणे निवेदन पंचनामाम्याप्रमाणे हस्तगत करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे मा. पोलीस उप आयुक्त श्री. सुभाष बुरसे साो., परिमंडळ १, ठाणे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. उत्तम कोळेकर साो., कळवा विभाग, ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पो.नि. नितीन पगार (प्रशासन), पो. नि. संजय दवणे, (गुन्हे) पो.नि. राजु पावोरकर, (का.सु) मुंबा पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे अंतर्गत तपास पथकातील सपोनि / विनायक माने, पो.हवा./ २५३५ देसले, पोहवा / ३३६९ गायकवाड, पोहवा/४२६ कांबळे, पोहवा/६५५६ वसावे, पोशि/७६४१ एडके, पोशि/२७५८ पाटोळे, पोशि/२०३४ सपकाळे, पोशि/१३९३ सुनिल अव्हाड, पोशि/ ४०१२ सुर्यवंशी यांनी विशेष उल्लेखनिय कामगिरी केली आहे.