पोलीस ठाणे विरगांव हद्यीत ०२ दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश ०२ दरोडेखोर जेरबंद…
प्रतिनिधी-रणजित मस्के
औरंगाबाद: फिर्यादी नामे भाऊसाहेब आसाराम गायकवाड वय ३७ वर्ष व्यवसाय शेती रा हमरापुर शिवार ता. वैजापुर जि. औरंगाबाद यांनी दिनांक ०२/११/२०२२ रोजी पोलीस ठाणे बिरगांव येथे फिर्याद दिली की, दिनांक ०२/११/२०२२ रोजी ०१:०० वा. च्या दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या घरात झोपलेले असतांना ०६ अनोळखी चोरटयांनी फिर्यादीचे घराचा दरवाजा तोडून कोयता, चाकू, गज, लाकडी काठया व कुन्हाडीचा दांडा या हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या देवून फिर्यादीचे वडील, भाऊ, आई यांना मारहाण व जखमी करुन तसेच फिर्यादीचे घराशेजारी कमलाबाई वाघ यांचेही घरात घुसून त्यांना वरिल हत्यारांचा धाक दाखवून बळजबरीने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १,३४,३००/- रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला आहे, त्यावरुन पोलीस ठाणे विरगांव येथे गुरनं २५० / २०२२ कलम ३९५ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

त्या अनुषंगाने तपास करून विरगांव पोलीस ठाणे यानी दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्यां टोळीचा पर्दाफाश करुन २ दरोडेखोर जेरबंद केले आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com