खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यानी १० लाखाची रोकड जबरीने हिसकावुन पळुन गेलेल्या २ आरोपीना ६ तासाच्या आत रोकडसह केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे :

दि.२५/०३/२०२५ रोजी खडकी पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मी ज्वेलर्स, खडकी बाजार, येथे फिर्यादी यांचे हातातील १०,००,०००/- रु ची रोकड असलेली बैंग पाठीमागे व पुढे नंबर प्लेट न लावलेल्या व्हेस्पा कंपनीचे मोटर स्कुटरवरुन आलेल्या व तोंडास रुमाल बांधलेल्या इसमांने रोकड असलेली पिशवी जबरीने हिसकावुन खडकी बाजारातुन अज्ञात ठिकाणी पलायन केले होते.

सदखाबत माहीती मिळाताच सदर ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांनी भेट देवून सदर घटनेचे तपासाबाबत मार्गदर्शन केले. सदर अनोळखी इसमांचे विरोधात खडकी पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीच्या बी.एन.एस. कलम. ३०९ (४) प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास चालु करण्यात आला होता. नमुद गुन्ह्यामध्ये आरोपी इसमांने जबरी चोरी करताना त्याची ओळख पटनार नाही या दृष्टीने चेहरा रुमालाने पुर्णपणे बांधुन तसेच वाहनास कोणतेही नंबर प्लेट न लावता रोकड घेवून पलायन केले होते.

त्याबाबत खडकी पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले, तपास पथकाचे प्रमुख दिग्विजय चौगले, व स्टाफ यांनी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करुन तांत्रीक विश्लेषण व सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे अनोळखी आरोपीचा गुन्हा करण्यापुर्वीचा माग काढुन ०६ तासाचे आत चाकण, पुणे येथुन इसम नामे, १) चेतन मंगेश गोडसे, वय २८ वर्षे, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे, २) आकाश कैलास माळी, वय २५ वर्षे, रा. सदर यांना गुन्ह्यातील जबरीने चोरण्यात आलेले रु. १० लाख रु रोकडसह व गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह अटक केली आहे.

सदरची कामगिरी ना. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि.४, श्री. हिंमत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्री. विठल दबडे यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप फुलपगारे यांचे मार्गदर्शना खाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. गजानन चोरमले, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक दिग्विजय चौगले, पोलीस अंमलदार संदेश निकाळजे, आशिष पवार, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, सुधाकर राठोड सुधाकर तागड, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट