पुणे युनिट ४ गुन्हे शाखेने व्यापा-याच्या अल्पवयीन मुलास व त्याचे कुंटुबास जीवे ठार मारण्याचा धाक दाखवुन खंडणी मागणारे ३ आरोपीतांना केले जेरबंद..

सह संपादक- रणजीत मस्के
पुणे :
येरवडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२०६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८(२),३०८ (६),१११,३ (५), सह बाल न्याय संरक्षण अधिनियम कलम ७५ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन दाखल गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवुन कारवाई करणेचे आदेश वरिष्ठांनी दिल्याने
प्राप्त आदेशा प्रमाणे दिनांक २६/०३/२०२५ रोजी युनिट ४ चे पथक व येरवडा पोलीस ठाणेचे पथक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार, अजय गायकवाड व वैभव रणपिसे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे रेहान कुरेशी, स्टिफन व रोहीत ओव्हाळ हे सोन्याचे दागिने विक्री करण्यास जाणार असुन ते तिघेही एका काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा गाडीवर आहेत. युनिट-४ कडील पथकास मिळालेल्या बातमी प्रमाणे तात्काळ सापळा लावुन कारवाई करणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अजय वाघमारे, यांनी मार्गदर्शन व सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने चंद्रमा चौकाच्या पुढे विश्रांतवाडी कडुन येणा-या रस्त्यावर सापळा लावुन सदर अॅक्टिवा मोटार सायकल अडवुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारता, त्यांनी त्याची नावे १) रेहान शब्बीर कुरेशी वय २६ वर्षे, रा. चंद्रमा नगर, हुसेन शहा दर्याजवळ, मेंटल कॉर्नर, येरवडा, पुणे, २) स्टिफन जॉन शिरसाठ वय २० वर्षे, रा. पुण्यनगरी सोसायटी, ए विंग, फ्लॅट नं.२, सोमनाथनगर, वडगांव शेरी, पुणे, ३) रोहीत नवनाथ ओव्हाळ, वय २४ वर्षे, रा. स.नं.१५३, मुक्तांगनजवळ, जाधवनगर येरवडा पुणे असे असल्याचे सांगितले त्यांची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ ३३०.९६० ग्रॅम (३३ तोळे ६९० मि.ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिणे व त्याचे ताब्यातील गाडीचे डीक्की मध्ये ०४ लाख रोख रक्कम असे गाडीसह एकुण १४,४२,०७०/-रु. किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
सदरचे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर दागिने त्याचे वस्तीमध्ये राहणारा मुलगा वाचेकडुन वेळोवेळी घेतलेले असल्याचे तसेच काही सोन्याचे दागिणे कैंपरी लोन वाघोली पुणे व कॅपरी लोन विश्रांतवाडी पुणे येथे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिण्याची ०४ लाख रक्कम असल्याचे सांगितले. सदर मुद्देमाल हा येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं.२०६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८ (२), ३०८ (६), १११,३ (५), सह बाल न्याय संरक्षण अधिनियम कलम ७५ वा गुन्ह्यातील असलेने वरिल आरोपी पुढील अधिक तपासकामी व योग्य कायदेशिर कारवाईकामी आरोपीसह जप्त मुद्देमाल येरवडा पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२, पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-४, गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, येरवडा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, सहा. पोलीस निरीक्षक विशाल टकले, पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार, प्रविण राजपुत, एकनाथ जोशी, पोलीस अमंलदार, अजय गायकवाड, विठ्ठल वाव्हळ, एकनाथ जोशी, प्रविण भालचीम, नागेशसिंग कुंवर, वैभव रणपिसे, बाबासाहेब कराळे, भरत गुंडवाड, मनोज सांगळे, राहुल परदेशी, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे यांनी केली आहे.